बोरी, हरणा नद्यांतील वाळू चाेरीची मोकाट वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:23 AM2021-04-04T04:23:07+5:302021-04-04T04:23:07+5:30
सोलापूर : हरणा नदीतील वाळूचा मजुराकरवी उपसा करून वाहतूक करणा-या मुस्ती येथील दोन वाहनासह ३० लाखाचा माल स्थानिक गुन्हे ...
सोलापूर : हरणा नदीतील वाळूचा मजुराकरवी उपसा करून वाहतूक करणा-या मुस्ती येथील दोन वाहनासह ३० लाखाचा माल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला. मात्र चोरिची वाळू विक्री करणारे म्होरके पोलिसांच्या थेट संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुस्ती येथील हरणा नदीच्या पात्रातून रात्री वाळूचा उपसा करून वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर पकडले. चालकांसह मजुरांवर गुन्हे दाखल करीत ३३ लाख ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अनेक दिवसांपासून वाळू चोरीचा प्रकार होत होता, परंतु माफिया पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला टीप मिळताच दबा धरून ही वाहने पकडण्यात आली. सहा जणांवर गुन्हे दाखल झाले तर तिघे पळून जाण्याचा यशस्वी ठरले.
बोरी नदीकाठी वाळू उपसा करणा-या मजुरांना आणि वाहन चालकांना पोलिसांनी हटकले. पण या वाहन धारकांचा वाटाड्या चाहूल लागताच कारमधून पसार झाला.त्यानंतर तोच पोलिसांच्या सतत संपर्कात राहू लागल्याने पोलिसांनी कारवाई करण्याचे टाळले, अशी माहिती पुढे आली आहे.