मोक्षधाम स्मशानभूमीला आयएसओ मानांकन प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:27 AM2021-02-17T04:27:57+5:302021-02-17T04:27:57+5:30
मंगळवारी सकाळी कार्यक्रमात नगरपालिका आणि प्रसन्नदाता ट्रस्ट यांना आयएसओचे सदस्य सोमनाथ पंडित,मोहन अणवेकर व आमदार राजेंद्र राऊत यांच्या ...
मंगळवारी सकाळी कार्यक्रमात नगरपालिका आणि प्रसन्नदाता ट्रस्ट यांना आयएसओचे सदस्य सोमनाथ पंडित,मोहन अणवेकर व आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते मानांकन सुपूर्द करण्यात आले.
नगराध्यक्ष असिफ तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, पाणीपुरवठा सभापती संतोष बारंगुळे व प्रसन्नदाता ट्रस्टचे अध्यक्ष कमलेश मेहता यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.
९००१-२०१५ गुणवत्ता व्यवस्थापन पद्धती आयएसओ सदस्य सोमनाथ पंडित म्हणाले की उद्योग व्यवसायात असे आयएसओ मिळवतात मात्र एखाद्या सामाजिक संस्थेने असे मानांकन मिळवणे हे विशेष असल्याचे सांगितले.
असिफ तांबोळी म्हणाले,पालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करू. तुमच्या कामामुळे बार्शीचा गौरव होत आहे. अमिता दगडे म्हणाल्या, बार्शी पालिकेने पर्यावरण पूरक अंतिम संस्कार गॅस दाहिणीची सुविधा उपलब्ध करून दिली. फक्त उभा केली नाही तर त्याची निगा राखली आहे. आ. राजेंद्र राऊत म्हणाले की, पूर्वी पालिकेत काम करताना आताच्या एवढ्या विकासाच्या योजना नव्हत्या. देशात दोन स्मशानभूमीला आयएसओ मानांकन मिळतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. मोक्षधामच्या कामामुळे पालिकेची प्रतिमा उंचावली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल कुलकर्णी यांनी केले तर आभार बंडू माने यांनी मानले.
यांचा झाला सन्मान
या कार्यक्रमात समाजिक कार्यासाठी मोठ्या देणगीदारांचा केला सत्कार करण्यात आला. यामध्ये
अरुण बारबोले, अशोक बलदोटा, माहेश्वरी समाजाचे गोविंद तापडिया, डॉ. लक्ष्मीकांत काबरा, अविनाश तोष्णीवाल, सुनील भराडीया,देवा खटोड, गोपाळ मुंदडा, दमन पुनमिया, पदम कांकरिया, सुमतीलाल मुनोत, गुगळे परिवार, स्व. शांताबाई पुनमिया,पुरुषोत्तम बंग, जैन झुणका भाकर केंद्र, मानवसेवा संस्था या व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला.
---१६बार्शी-मोक्षधाम