पालखी मार्गाच्या कामाचा मुहूर्त लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:21 AM2021-04-13T04:21:14+5:302021-04-13T04:21:14+5:30

लोकसभा व विधानसभेतही याबाबतच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारीची री ओढली आहे. या प्रकरणाचा चेंडू सध्या महामार्ग लवादाकडे आहे. हा ...

Moment of work on Palkhi route postponed | पालखी मार्गाच्या कामाचा मुहूर्त लांबणीवर

पालखी मार्गाच्या कामाचा मुहूर्त लांबणीवर

Next

लोकसभा व विधानसभेतही याबाबतच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारीची री ओढली आहे. या प्रकरणाचा चेंडू सध्या महामार्ग लवादाकडे आहे. हा प्रश्न रेंगाळत असल्याने रस्त्याचे कामही प्रलंबित आहे. अद्यापही कामाला मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसत आहे.

महामार्गात जमिनींचे भूसंपादन करताना माळशिरस हद्दीतील जमिनींना ग्रामपंचायत हद्दीतील जमिनीपेक्षा अत्यंत कमी दराने मोबदला जाहीर केल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी याविरुद्ध आवाज उठवत तक्रार दाखल केली.

या मुद्द्यावरून लोकसभेत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी तर विधानसभेत आमदार राम सातपुते यांनी दोनवेळा प्रश्न उपस्थित केला. यामध्ये भूसंपादनात अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले. मात्र अद्यापही बाधित शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सध्यातरी शहराच्या हद्दीत महामार्गाचे काम बंद स्थितीत आहे.

कोट :::::::::::::::::::

भूसंपादनात झालेल्या भ्रष्टाचार बाबतचा विषय विधानसभा व लोकसभेत मांडला आहे. लवकरच याबाबत रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी व कारवाई न झाल्यास राज्य सरकार विरुद्ध आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे.

- राम सातपुते

आमदार, माळशिरस

Web Title: Moment of work on Palkhi route postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.