निर्मनुष्य रस्त्यांवर सोमवारी दिसली नागरिकांची वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:28+5:302021-06-09T04:27:28+5:30
तब्बल दीड महिन्यानंतर सुरू झालेल्या मंगळवेढा बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी पहिल्या ग्राहकांचे स्वागत केले. व्यापारपेठ सुरू झाल्याने दुकानदारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून ...
तब्बल दीड महिन्यानंतर सुरू झालेल्या मंगळवेढा बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी पहिल्या ग्राहकांचे स्वागत केले. व्यापारपेठ सुरू झाल्याने दुकानदारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. मोबाईल दुकान, दुचाकी दुरुस्ती, सर्व्हिसिंग यासह कपडे, चप्पल, खरेदीसह इलेक्ट्रॉनिक दुकानातही गर्दी दिसून येत होती.
कोरोनामुळे १८ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू होता. आता तालुक्यात रुग्णसंख्या घटल्याने ७ जूनपासून अनलॉक करण्यात आले आहे. तालुक्यात दीड महिन्यानंतर सर्व प्रकारचे व्यवहार सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे, तर प्रवासी वाहतूक सुरू झाली असून, बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ दिसून आली.
नगरपालिका पथक करत होते सूचना
नागरिकांची गर्दी कोविडचा झपाट्याने संसर्ग वाढण्यासाठी पोषक असून, नागरिकांची गर्दी होऊ नये, बेशिस्तांवर कारवाई करण्यासाठी कोविड नियंत्रण पथक तयार केले आहे. याच कोविड नियंत्रण पथकातील नगरपालिका अधिकारी, कर्मचारी सोमवारी सकाळपासून शहरातील बाजारपेठेत तालुका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करीत होते.
फ़ोटो ::::::::::::::::
मंगळवेढा बाजारपेठेत दामाजी रोडवर उसळलेली गर्दी.