करजगी ग्रामीण रुग्णालयासाठी सोमवारी चाबुक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:20 AM2021-02-14T04:20:58+5:302021-02-14T04:20:58+5:30
वागदरी - भुरीकवठे रस्ता करण्याची मागणी ब-हाणपूर : पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडाला जोडणारा अक्कलकोट तालुक्यातील वागदरी- भुरीकवठे रस्त्यावर १५ ...
वागदरी - भुरीकवठे रस्ता करण्याची मागणी
ब-हाणपूर : पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडाला जोडणारा अक्कलकोट तालुक्यातील वागदरी- भुरीकवठे रस्त्यावर १५ ते २० मीटरच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो. अशा रस्त्याकडे स्थानिक प्रतिनिधींनी लक्ष्य देऊन तात्काळ खड्डे भरावे अशी मागणी नागरिक व प्रवाशांमधून होत आहे.
गुरववाडी -नागणसूर रस्त्याची दुरवस्था
उडगी: अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी - नागणसुर हा पाच किलो मीटर रस्ता अत्यंत खराब आहे. या रस्त्यावरुन शाळकरी मुले, ऊस व शेतीमालाची वाहतूक होते. या मार्गावर काटेरी झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री काटेरी झुडपांमुळे समोरचा रस्ता दिसत नसल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता २५ते ३० वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर डागडुजी होत राहिली. आता नविन रस्ता करण्याची मागणी जोर धरत आहे.
ऊस तोड अंतिम टप्प्यात
चपळगाव : यंदाचा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत युध्दपातळीवर ऊस तोडणी झाली. विशेषतः चपळगाव परिसरातील ऊसाच्या पट्ट्यावर सिध्देश्वर, मातोश्री, गोकुळ, गोकुळ माऊली, जयहिंद शुगर्सचा गळीत हंगाम अवलंबून असतो. ऊस तोडणी अंतिम टप्प्यात आली असून लवकरच कारखान्याचा पट्टा पडेल असा अंदाज असल्याने राहिलेल्या ऊस उत्पादक शेतक-यात ऊस जाईल की नाही याची चिंता भेडसावत आहे.
डोंबरजवळगे-तिर्थ रस्ता दुरूस्तीची मागणी
चपळगाव- डोंबरजवळगे व तिर्थ या गावांना जोडणारा पाच कि.मी.चा रस्ता अनेक वर्षांपासून खराब झाला आहे. अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या तालूक्यांना जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे. या मार्गावरून प्रामुख्याने शेतकरी, नोकरदार व व्यापारी प्रवास करत आहे. या रस्त्याच्या दुरस्तीची मागणी केली जात आहे.