कर्मचारी असल्याचे भासवून मॉनिटर पळविला

By admin | Published: July 23, 2014 12:55 AM2014-07-23T00:55:34+5:302014-07-23T00:55:34+5:30

बेडर पूलनजीक असलेल्या राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये हा प्रकार

Monitor pretended to be an employee and ran the monitor | कर्मचारी असल्याचे भासवून मॉनिटर पळविला

कर्मचारी असल्याचे भासवून मॉनिटर पळविला

Next


सोलापूर : हॉस्पिटलमध्ये जसा एखादा वॉर्डबॉय वागतो, अगदी तसाच काहीसा प्रकार काही काळ चोरट्याने केला. कुणाला शंकाही येणार नाही, या पद्धतीने चोरटा वावरत असताना त्याने एका रुग्णाची नाडीही तपासत डॉक्टराचा संदर्भ देत अतिदक्षता विभागातील मॉनिटर हातोहात पळविला. लष्कर भागातील बेडर पूलनजीक असलेल्या राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला.
गोऱ्या रंगाचा बुटका असलेला हा तोतया वॉर्डबॉय राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये घुसला. हॉस्पिटलच्या आवारात फेरफटका मारून त्याने अंदाजही घेतला. कुठे डल्ला मारायचा याच्या शोधात तो होता. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातही त्याने एंट्री केली. या विभागात बिराजदार नावाचा रुग्ण दाखल असून, त्याची तपासणी करून डॉ. राहुल दत्तात्रय देशपांडे हे निघून गेले. ही संधी साधून चोरट्याने बिराजदारची विचारपूस करीत त्याची नाडी तपासली. रुग्णालाही वाटले हा हॉस्पिटलचा वॉर्डबॉय असेल. डॉक्टराचा संदर्भ देत त्याने मॉनिटर पळविला. या प्रकरणी डॉ. देशपांडे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तपास सहायक फौजदार बाबर करीत आहेत.
--------------------------
कॅमेरे असते तर....
डॉ. देशपांडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा नसल्याचे समजले. कदाचित ती यंत्रणा असली असती तर चोरटा नक्कीच सापडला असता.

Web Title: Monitor pretended to be an employee and ran the monitor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.