दीड महिन्यापासून मजुरांची जगण्यासाठी धडपड सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:17 AM2021-06-04T04:17:48+5:302021-06-04T04:17:48+5:30
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात भूमिहीन शेतमजूर आहेत. अनेक मजुरांनी इतरत्र वर्षाकाठी ऊसतोड मजूर म्हणून न जाता मुलांच्या ...
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात भूमिहीन शेतमजूर आहेत. अनेक मजुरांनी इतरत्र वर्षाकाठी ऊसतोड मजूर म्हणून न जाता मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडून कामाला जाणे बंद केले आहे. स्थानिक भागातच मिळेल त्या रोजगारावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. हेच मजूर दामाजी चौक, शिवप्रेमी चौक या ठिकाणी काम मिळविण्यासाठी येतात. तेथून ते मुकादमाच्या मदतीने गवंडीकाम, ठेकेदार, शेतीसह लागेल तेथे कामासाठी जातात.
गेल्या दीड-दोन महिन्यापासून लॉकडाऊनमुळे त्यांना गावांसह शहराच्या ठिकाणी रोजगार मिळणे कठीण बनले आहे. त्यांच्याजवळ असलेली आर्थिक पूंजी संपल्यामुळे त्यांना दररोज जगण्याचा प्रश्न भेडसावत आहे. या मजुरांना दिवसाकाठी ४०० रुपये मजुरी मिळते. मात्र लॉकडाऊनमुळे काम नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
फोटो ओळी ::::::::::::::::
मंगळवेढा शहर व परिसरात काम मिळविण्यासाठी मजुरांनी केलेली गर्दी.