पंढरपुरात फेब्रुवारीमध्ये ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सव २०१९’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:44 AM2019-01-07T10:44:42+5:302019-01-07T10:48:08+5:30

सोलापूर : कृषी क्षेत्राच्या समृद्धीसाठी नेहमीच आघाडीवर असलेल्या ‘लोकमत’ने यंदा १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान पंढरपूर येथे लोकमत अ‍ॅग्रोत्सवाचे आयोजन ...

In the month of Pandharpur, the 'Lokmat Agroves 2019' | पंढरपुरात फेब्रुवारीमध्ये ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सव २०१९’

पंढरपुरात फेब्रुवारीमध्ये ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सव २०१९’

googlenewsNext
ठळक मुद्देयंदा १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान पंढरपूर येथे लोकमत अ‍ॅग्रोत्सवाचे आयोजनमहाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट शेतकरी याच अ‍ॅग्रोत्सवात ठरणारडाळिंब उत्पादन आणि बाजारपेठ याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ उपस्थित राहणार

सोलापूर : कृषी क्षेत्राच्या समृद्धीसाठी नेहमीच आघाडीवर असलेल्या ‘लोकमत’ने यंदा १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान पंढरपूर येथे लोकमत अ‍ॅग्रोत्सवाचे आयोजन केले आहे. नव्या तंत्रज्ञानाची कास धरून शेती क्षेत्रात क्रांती करणाºया उदयोन्मुख शेतकºयांची यशोगाथा ‘लोकमत’च्या व्यासपीठावर शेतकरी स्वत: उलगडणार आहेत.

महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट शेतकरी याच अ‍ॅग्रोत्सवात ठरणार आहे. या अ‍ॅग्रोत्सवाचे आयोजन करण्यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची पहिली बैठक लोकमत भवनमध्ये पार पडली. यावेळी उपस्थितांनी कृषी प्रदर्शनाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले़ बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ़ लालासाहेब तांबडे, अ.भा.डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे आणि ‘आत्मा’ चे संचालक विजयकुमार बरबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेती क्षेत्रातील उदयोन्मुख पिढीच्या आणि कृषी क्षेत्राच्या सबलीकरणाचा प्रयत्न म्हणून ‘लोकमत’ने महाराष्ट्रातील नागपूर, जळगाव, औरंगाबाद आणि पंढरपूर या चार शहरांमध्ये लोकमत अग्रोत्सव २०१९ चे आयोजन केले आहे. प्रत्येक टप्प्यावर कृषी क्षेत्राला भेडसावणाºया प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम या अ‍ॅग्रोत्सवात करण्यात येणार आहे. या कृषी प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कृषी क्षेत्राशी संबंधित विविध संस्था, कृषी सामुग्री-उपकरणे-अवजारे आणि तंत्रज्ञान यांचे उत्पादक, विक्रेते, वितरक, विपणन व्यावसायिक, माध्यम तज्ज्ञ, राष्ट्रीय असोसिएशन आणि अन्य शासकीय कृषी संबंधित प्राधिकरणे यांना यानिमित्ताने एकत्र करण्यात येणार आहे. 
राज्यातील शेतकरी वर्गासाठी आगळेवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा ‘लोकमत’चा प्रयत्न आहे. या व्यासपीठावर राज्याच्या सर्व भागातील कृषीतज्ज्ञ, गुंतवणूकदार, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी आणि प्रसार माध्यमे एकत्र येतील व कृषी क्षेत्राबद्दल विचार विनिमय करतील. १३ ते १६ फेब्रुवारी २०१९ दरम्यान चार दिवस कृषी प्रदर्शन पंढरपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होणार आहे़ 

शेतकºयांचे व्यासपीठ
च्पारंपरिक शेतीला छेद देऊन नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत शेती क्षेत्रात बदल करणाºया शेतकºयांच्या यशोगाथा या अ‍ॅग्रोत्सवात मांडण्याची संधी दिली जाणार आहे. जलव्यवस्थापन, शाश्वत शेती, शेतकरी उत्पादक कंपनी या क्षेत्रातील मान्यवर आणि शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत.

  •   राज्यभरात कल्पकतेने शेती करणारे तसेच कृषीतज्ज्ञ आपले मनोगत ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून मांडणार आहेत.

कृषी पुरस्कार

  •  शेती क्षेत्रात नवी पिढी येत आहे. तसेच पारंपरिक शेतीत अनेक प्रयोग करून विक्रमी उत्पादन काढणाºया शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट शेतकरी, कल्पक शेतीतंत्र, सर्वोत्तम उत्पादन-फळे व भाज्या , सौर ऊर्जेचा कल्पकतेने वापर , जलव्यवस्थापनाचे तंत्र , सौर ऊर्जेचे तंत्र आदींसाठी शेतकºयांना कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 
  •  याचवेळी राज्यातील सर्वोत्कृष्ट शेतकरी हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे़ पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी या प्रदर्शनात सहभागी होतील.

डाळिंब, ऊस पिकावर मार्गदर्शन
सांगोला तालुक्यातील डाळिंबाने जागतिक बाजारपेठेत आपली अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. डाळिंब उत्पादन आणि बाजारपेठ याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा उसाच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहे. साखर कारखानदारीतही सोलापूरने आघाडी घेतली आहे. उसाचे सरासरी उत्पादन वाढवण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी शेतकरी आणि कृषीतज्ज्ञ शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहेत.
मनोरंजन आणि बरंच काही....
पंढरपूरच्या लोकमत अग्रोत्सवात कृषी क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कृषीसाठी शासकीय योजना, करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

Web Title: In the month of Pandharpur, the 'Lokmat Agroves 2019'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.