हलगीच्या कडकडाटात बार्शी तहसील कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:32+5:302020-12-09T04:17:32+5:30
बार्शी : नव्या कृषी कायद्याविरोधात मंगळवारी शेतकरी संघटनांकडून राष्ट्रव्यापी बंदची हाक देण्यात आली. या बंदला बार्शी शहर ...
बार्शी : नव्या कृषी कायद्याविरोधात मंगळवारी शेतकरी संघटनांकडून राष्ट्रव्यापी बंदची हाक देण्यात आली. या बंदला बार्शी शहर व तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. तसेच शेतकरी संघटनेबरोबर कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तालुक्यातील शेतकरी, कामगार, शेतमजूर, विद्यार्थी यांनी या कायद्याविरोधात आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर व तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतकरीच माल घेऊन न आल्याने भाजी मंडईत भाजीपाल्याचे लिलाव झाला नाही. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार बंद राहिले. शेतमालाचे सर्वप्रकराचे सौदे ठप्प झाले.
यावेळी शिवसेनेचे नागेश अक्कलकोटे, शिवसेना शहरप्रमुख दीपक आंधळकर, विक्रम सावळे, सुप्रिया गुंड, विनायक माळी, विवेक गजशिव, ॲड हर्षवर्धन बोधले, महेश चव्हाण, निवेदिता आरगडे, निखिल मस्के, प्रवीण मस्तूद, सुवर्णा शिवपुरे, तानाजी बोकेफोडे, लहू आगलावे, धनंजय जगदाळे, मंगेश चव्हाण उपस्थित होते.
आंधळकर, अक्कलकोटे, ठोंबरे आदींनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप, बहुजन वंचित आघाडी, अनिस, समता परिषद, माकप, भारिप, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय गिरणी कामगार, आयटक, स्टुडंट फेडरेशन, अल्पसंख्याक सेल, कामगार संघटना, जगदाळे मामा, कामगार संघटना आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. तहसीलदार प्रदीप शेलार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
---
हलगीच्या कडकडाटात निघाला मोर्चा
कृषी उत्पन्न बाजार समितीमधून स्थानिक सर्वपक्षाच्या वतीने हलगीच्या कडकडाटात मोर्चा काढण्यात आला. बस स्टॅण्ड, पोस्ट चौक, सोमवार पेठ, भगवंत मंदिरमार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. येथे केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी झाली.
---
एसटीसह इतर सेवा बंद
या बंदीमुळे एसटी सेवादेखील बंद राहिली. त्यामुळे स्थानकासमोर मोठ्या प्रमाणावर बसेस उभ्या राहिल्या. केवळ पेट्रोलपंप, मेडिकल, हॉस्पिटल, बँका, शासकीय कार्यालयेवगळता सर्व आस्थापना बंद होत्या.
--
फोटो : ०८ बार्शी
बार्शीत हलगीच्या कडकडात शिवसेनेसह इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.