ज्योती क्रांती परिषदेचा मोहोळ तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:16+5:302021-07-02T04:16:16+5:30

मोहोळ : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्याच्या प्रमुख मागणीकरिता ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र ...

Morcha of Jyoti Kranti Parishad in Mohol tehsil | ज्योती क्रांती परिषदेचा मोहोळ तहसीलवर मोर्चा

ज्योती क्रांती परिषदेचा मोहोळ तहसीलवर मोर्चा

googlenewsNext

मोहोळ : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्याच्या प्रमुख मागणीकरिता ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाच्या वतीने निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे यांनी स्वीकारले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आल्याने ओबीसींवर मोठा अन्याय झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे धोक्यात आलेले राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सरकारने त्वरित कारवाई करावी, अन्यथा ज्योती क्रांती परिषदेच्या माध्यमातून राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी रमेश बारसकर यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रदेश प्रवक्ते शीलवंत क्षीरसागर, सिद्धार्थ एकमल्ले, जितेंद्र अष्टुळ, संगीता पवार, अनंत नागनकेरी,अतुल क्षीरसागर, रमेश सनगर, सागर अष्टुळ, बाळासाहेब माळी, आकाश नाळे, सुलतान पटेल, सोमनाथ माळी, श्रीकांत गाढवे, अजय कुर्डे, लखन कोळी आदींसह महिला ही मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

----

फोटो : ०१ मोहोळ

मोहोळ तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला संबाेधित असताना ज्योती क्रांती परिषदेचे रमेश बारसकर.

Web Title: Morcha of Jyoti Kranti Parishad in Mohol tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.