५० पेक्षा जास्त लोक जमले, मंगल कार्यालय मालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:26 AM2021-03-01T04:26:16+5:302021-03-01T04:26:16+5:30
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आदेश जारी केले आहेत. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक उदार, पोलीस ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आदेश जारी केले आहेत. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक उदार, पोलीस माळी, साठे हे पेट्रोलिंग करताना दुपारी लातूर बायपासवरील एका मंगल कार्यालयात आले असता ३०० ते ३५० लोकांची गर्दी दिसली. त्यामुळे त्यांनी मालक दादासाहेब हरी शिंदे यांना बोलावून जिल्हाधिकाऱ्यांची ५० जणांची परवानगी असल्याचा आदेश माहिती नाही काय, असे विचारताच त्यावर हा आदेश मला माहिती नाही, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी कोरोना संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली घातक कृती करून आदेशाचा भंग केला. त्यामुळे पोलीस नाईक बजरंग यल्लप्पा जाधव यांनी शहर पोलिसांत तक्रार देताच भा.दं.वि. २६९, २७०, १८८ व राष्ट्रीय आपत्ती कायदा कलम ५१ ब प्रमाणे गुन्हा दाखल केला.