अधिकाधिक संस्था मतदारयादीत येण्यासाठी सर्वसाधारण सभेत विषय मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:23 AM2021-02-11T04:23:52+5:302021-02-11T04:23:52+5:30
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक सुरू होणार असल्याने पात्र यादीत समावेश होण्यासाठी दूध संस्थांच्या सुरू ...
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक सुरू होणार असल्याने पात्र यादीत समावेश होण्यासाठी दूध संस्थांच्या सुरू असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ते बोलत होते.
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या सभासद संस्थांची संख्या १६०० इतकी आहे. त्यापैकी ६२ दूध संस्था या क्रियाशील ठरल्याने संघाच्या निवडणुकीसाठी पात्र यादीत आल्या आहेत. उर्वरित १५०० दूध संस्था अक्रियाशील ठरल्याने मतदारयादीसाठी अपात्र ठरल्या. ९७ व्या घटना दुरुस्तीच्या अंमलबजावणीसाठी दूध संघाने विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी घेतली आहे. त्याची अंमलबजावणी येत्या संचालक मंडळ निवडीसाठी करण्यात येत आहे. मतदारयादीत समावेश होण्यासाठी संस्थांना केलेल्या नियमावलीमुळे ६२ दूध संस्था पात्र तर १५०० संस्था अपात्र ठरल्याने हा वाद निर्माण झाला आहे. अधिकाधिक संस्था मतदारयादीत येण्यासाठी येत्या महिन्याभरात होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे विषय मंजुरीसाठी ठेवणार असल्याचे चेअरमन माने यांनी सांगितले.
५ मार्च २०१३ रोजी दूध संघाच्या संचालक मंडळाने ९७ व्या घटना दुरुस्ती अंमलसाठी मंजुरी दिली. १२ एप्रिल २०१३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत घटना दुरुस्तीचा अंमल करण्यास मंजुरी घेतली. जिल्हा दूध संघाने पाठविलेल्या प्रस्तावास १७ सप्टेंबर २०१३ रोजी जिल्हा उपनिबंधकांनी मंजुरी दिली. आता निकषात काही बदल करून त्यानुसार पात्र संस्थांची यादी करण्याचा प्रयत्न राहिल, असे दिलीप माने म्हणाले.
२७ संस्थांचे अपील
निवडणूक मतदार यादीसाठी अपात्र ठरलेल्या १५०० पैकी २७ संस्थांनी विभागीय उपनिबंधकाकडे अपील केले आहे. उर्वरित संस्था अपिलात गेल्या नाहीत. म्हणजे प्रत्येकाने न्यायालयीन लढाई केली पाहिजे असे नाही. ते प्रत्येक संस्थेला शक्यही नाही. संचालकांनीही डिसेंबर महिन्यात झालेल्या सभेत संस्थांना अक्रियाशील ठरविल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत विरोध दर्शविला आहे.