कुरनूर ग्रामपंचायतीवर मोरे गटाचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:22 AM2021-01-25T04:22:43+5:302021-01-25T04:22:43+5:30
विरोधी पॅनेलमध्ये माजी सरपंच अमर पाटील, बाबासाहेब पाटील व पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे तसेच राहुल काळे ...
विरोधी पॅनेलमध्ये माजी सरपंच अमर पाटील, बाबासाहेब पाटील व पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे तसेच राहुल काळे यांच्या पॅनेलचा समावेश होता. यात फक्त पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब मोरे यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या. उर्वरित पाटील आणि काळे गटाला एकही जागा मिळाली नाही. त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले. प्रभाग चारमध्ये स्वतः व्यंकट मोरे यांनी माजी सरपंच अमर पाटील यांचा पराभव केला, तर वाॅर्ड एकमध्ये माजी उपसभापती स्वामीराव पाटील यांचे चिरंजीव बाबासाहेब पाटील यांचा विद्यमान सरपंच वत्सलाबाई मोरे यांनी पराभव केला.
अमर पाटील गटाकडून उभारलेल्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या शोभा काळे यांचाही प्रभाग दोनमध्ये रेश्मा शिंदे यांनी पराभव केला. बाळासाहेब मोरे यांचे चिरंजीव चेतन मोरे हे प्रभाग दोनमध्ये पहिल्यांदा निवडून आले. दोनचे सर्व उमेदवार हे बाळासाहेब मोरे गटाचे निवडून आले. इतर सर्व प्रभागांमध्ये व्यंकट मोरे यांच्या पॅनेलने वर्चस्व मिळवले. सलग दुसऱ्यांदा मोरे गटाने विजय मिळवून ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत प्रभाग १ मध्ये विद्यमान सरपंच वत्सलाबाई मोरे, लक्ष्मी शिंगटे, रुक्साना मुजावर, प्रभाग २ मध्ये चेतन मोरे, रेश्मा शिंदे, रमेश पोतदार, प्रभाग ३ मध्ये राजू गवळी, नौशाद तांबोळी, प्रभाग ४ मध्ये व्यंकट मोरे, सुनंदा शिंदे, अलका सुरवसे हे अकरा उमेदवार विजयी झाले.
---