मोफत शिक्षणासाठी आले नऊ हजारापेक्षा अधिक अर्ज
By शीतलकुमार कांबळे | Published: March 25, 2023 02:15 PM2023-03-25T14:15:41+5:302023-03-25T14:16:54+5:30
२९५ शाळा अॅडमीशनसाठी सज्ज: अर्ज करण्याची आज शेवटची संधी.
शीतलकुमार कांबळे, सोलापूर : शाळांमध्ये आरटीईच्या माध्यमातून मोफत प्रवेश दिला जातो. सोलापूर जिल्ह्यात यावर्षी २९५ शाळा अॅडमीशनसाठी सज्ज आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी नऊ हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतात. यावर्षी २९५ शाळा आरटीईमधून मोफत प्रवेश मिळतील. या शाळात २ हजार २९७ जांगावर प्रवेश देणार आहेत. यासाठी ९ हजार अर्ज आले आहेत. एकूण जागेच्या चौपट अर्ज आल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
आरटीई प्रवेशासाठी सर्व प्रक्रिया ही पुणे येथून होते. ऑनलाईन प्रणालीद्वारे ही प्रक्रिया होत आहे. २५ मार्च रोजी प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर पालकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएस येईल. पालक व शाळांना मुलाची माहिती आल्यानंतर प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु होणार आहे. लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"