सकाळी निदर्शने दुपारी कामावर; सोलापूरमध्ये शिस्तभंग कारवाईच्या भीतीनं कर्मचारी कार्यालयात

By विलास जळकोटकर | Published: March 14, 2023 05:56 PM2023-03-14T17:56:09+5:302023-03-14T17:56:47+5:30

‘एकच मिशन जुनी पेन्शन’चा नारा देत विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात महापालिका कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या.

morning demonstrations at afternoon work in solapur | सकाळी निदर्शने दुपारी कामावर; सोलापूरमध्ये शिस्तभंग कारवाईच्या भीतीनं कर्मचारी कार्यालयात

सकाळी निदर्शने दुपारी कामावर; सोलापूरमध्ये शिस्तभंग कारवाईच्या भीतीनं कर्मचारी कार्यालयात

googlenewsNext

सोलापूर : ‘एकच मिशन - जुनी पेन्शन’ या प्रमुख मागणीसाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात सोलापूर महापालिकेतील कर्मचारी सकाळी निदर्शनासाठी सहभागी झाले आणि दुपारी शिस्तभंगाच्या कारवाईच्या भीतीनं कार्यालयात हजर झाल्याचे चित्र दिसून आले.

‘एकच मिशन जुनी पेन्शन’चा नारा देत विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात महापालिका कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. सोलापूर महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने महापालिका आयुक्तांना यापूर्वीच निवेदन देण्यात आले होते. कोणत्याही स्थितीत हा संप यशस्वी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. सकाळच्या सत्रात निदर्शने आंदोलन झाल्यानंतर मात्र सोलापूर महापालिकेच्या प्रशासकीय इमारत कौन्सिल हॉल सभागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये बहुतांशपणे कर्मचाऱ्यांनी गजबजलेली दिसून आली. काही कर्मचाऱ्यांनी तर सकाळीच बायोमेट्रिक हजेरी लावली होती.

Web Title: morning demonstrations at afternoon work in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.