मृत्यूदर घटला.. ३९३ रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:23 AM2021-05-18T04:23:10+5:302021-05-18T04:23:10+5:30
शहरात दररोजच्या तपासणीतही सध्या नगण्य रुग्ण आढळत आहेत. शहरातील ४५ वयोगटापुढील लाभार्थ्यांना मंगळवारपासून नगरपालिकेच्या वतीने लसीच्या दुसऱ्या डोससाठी प्राधान्याने ...
शहरात दररोजच्या तपासणीतही सध्या नगण्य रुग्ण आढळत आहेत. शहरातील ४५ वयोगटापुढील लाभार्थ्यांना मंगळवारपासून नगरपालिकेच्या वतीने लसीच्या दुसऱ्या डोससाठी प्राधान्याने व काहींना पहिल्या डोससाठी नावनोंदणी नगरपालिकेच्या वतीने सुरू केली जाणार आहे.
कुर्डूवाडी शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने योग्य काळजी घेत प्रत्येक विभागातील स्वच्छता मोहीम व फवारणी दररोजच्या दररोज करण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या टीम कार्यरत आहेत. दररोज सकाळी नगरपालिकेच्या विविध पथकांद्वारे शहरातील होम आयसोलेशन झालेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या घरी भेटी दिल्या जातात. त्यात त्यांना शहरातून गैरमार्गाने न फिरता घरी बसून योग्य ती काळजी घेण्याचे सांगितले जाते. त्यातूनही काही रुग्ण असे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. शहरातील कोरोना हद्दपार होण्यासाठी नागरिकांनी योग्य ते सहकार्य केल्यास लवकर शहर कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
----
लसीकरणासाठी असे केले नियोजन
मंगळवारपासून महात्मा फुले कॉलेजमध्ये लसीकरण करण्यासाठी नावनोंदणी करण्यात येणार आहे. त्यांना तिथेही वेगवेगळ्या बेंचवर बसवून जागेवरच नावनोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर लसीचा वेळ कळविला जाणार आहे. त्यातून लोकांची गर्दी होणार नाही. त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल असे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले.