वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे मोरवड गाव अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:22 AM2021-05-09T04:22:51+5:302021-05-09T04:22:51+5:30
करमाळा तालुक्यातील मोरवड गावाला ‘भगीरथ’ने २४ तास वीजपुरवठा होतो. मात्र वादळी वाऱ्यात विहाळ येथून मोरवडला जाणारी मुख्य लाइन कोसळली ...
करमाळा तालुक्यातील मोरवड गावाला ‘भगीरथ’ने २४ तास वीजपुरवठा होतो. मात्र वादळी वाऱ्यात विहाळ येथून मोरवडला जाणारी मुख्य लाइन कोसळली आहे. याबाबत नागरिकांनी पाठपुरावा केला. मात्र, शुक्रवारपर्यंत विद्युत पुरवठा सुरू झाला नाही.
राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश काळे यांच्या मते वाऱ्यामुळे येथील विद्युत वाहिनीचे खांब कोसळले आहेत. यामुळे संपूर्ण गाव अंधारात आहे. विद्युत मंडळाने हे काम लवकर करणे अपेक्षित आहे. मात्र, दुर्लक्षामुळे काम झालेले नाही. गाव अंधारात राहू नये म्हणून शेतीचा वीजपुरवठा केबल टाकून तात्पुरता जोडला होता. मात्र, लोड आल्याने ती जळाली व पुन्हा गाव अंधारात बुडाले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी महेश काळे यांनी केली आहे.
-----