मोहोळ मंडलात सर्वाधिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:16 AM2021-06-28T04:16:34+5:302021-06-28T04:16:34+5:30
मागील तीन वर्षे सातत्याने पाऊस कमी पडला आहे. मागील वर्षी सरासरी ५८६ मिलिमीटर पाऊस पडला होता. चालू वर्षी १ ...
मागील तीन वर्षे सातत्याने पाऊस कमी पडला आहे. मागील वर्षी सरासरी ५८६ मिलिमीटर पाऊस पडला होता. चालू वर्षी १ जूनपासून २७ जूनपर्यंत तालुक्यातील आठ मंडलांमधे सरासरी ७० मिलिमीटर इतकी नोंद झाली आहे . आजतागायत मोहोळ मंडलात सर्वाधिक २११.०८ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. पेनूर मंडल ४२.०२, कामती मंडल ९१, शेटफळ मंडल ६७, टाकळी मंडल ११.४७, वाघोली ३६, नरखेड ४९, सावळेश्वर मंडल ९१ इतका सरासरी ७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यंदा खरिपाच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली असून, काही ठिकाणी पेरणी झाली आहे. या पावसाने पेरणीला वेग येणार आहे.
---
मोहोळ शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दक्षिण बाजूस पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर पुरेशी ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणी पाऊस पडला की तब्बल चार ते पाच फूट खोल पाण्याचे तळेच रस्त्यावर साठत असल्याने त्यामधूनच सोलापूरकडून पंढरपूरकडे जाणारी दुचाकी व चारचाकी वाहने जातात. वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, याबाबत महामार्ग दुरुस्ती करणाऱ्या बेजबाबदार यंत्रणेबाबत वाहनचालक व ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
फोटो : २७ मोहोळ १
पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने पाण्याचे तळे निर्माण झाले आहे.