मुलासह आईचाही चाकूने भोसकून खून; घटनेनंतर धक्कादायक कारण समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 21:36 IST2024-12-24T21:34:04+5:302024-12-24T21:36:00+5:30
घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी सौदागर पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मुलासह आईचाही चाकूने भोसकून खून; घटनेनंतर धक्कादायक कारण समोर
Barshi Murder Case : बार्शी तालुक्यातील भोयरे येथे शेतीच्या वादातील कारणावरून पुतण्याने घरातील तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात मायलेक ठार झाले आहेत, तर तिसरा गंभीर जखमी झाला असून त्यांच्या उपचार सुरू आहे. ही घटना काल २३ डिसेंबर रोजी सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. यात सागर किसन पाटील, सिंधू किसन पाटील हे दोघे ठार झाले असून किसन गोवर्धन पाटील हे जखमी झाले आहेत. ़
सौदागर पाटील, सोनाली सौदागर पाटील व निर्मला पाटील (रा. भोयरे, ता. बार्शी) यांच्या विरोधात नानासाहेब किसन पाटील यांनी बार्शी तालुका सिंधू पाटील सागर पाटील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील सौदागर पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपींनी शेतीच्या बांधाच्या व पाऊलवाटेच्या कारणावरून बैलगाडी अडविली. किसन पाटील, सिंधू पाटील व सागर पाटील यांना शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच आरोपीने सागर आणि सिंधू यांच्या पोटात चाकू खुपसून खून केला. तसेच त्याच चाकूने किसन यांच्या बरगडीत, कमरेच्या खाली वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी नानासाहेब पाटील यांच्या हाताच्या बोटालाही मार लागल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे.
भाऊ शेतातून धावून आला
फिर्यादी नानासाहेब पाटील यांना त्यांचा भाऊ सागर यांचा फोन आला. ते म्हणाले, आमची बैलगाडी अडवून भांडण करीत आहेत. तेव्हा नानासाहेब पाटील शेतातून तत्काळ गावात आले. त्यानंतर आई- वडिलांसह भावावर वार केल्याचे त्यांना दिसून आले.