पाच एकर जमिनीसाठी जावयाने काढला सासूचा काटा; मंगळवेढा तालुक्यातील घटना

By Appasaheb.patil | Published: October 23, 2022 03:44 PM2022-10-23T15:44:10+5:302022-10-23T15:44:17+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Mother-in-law's thorn removed by son-in-law for five acres of land; Incidents in Mangalvedha Taluk | पाच एकर जमिनीसाठी जावयाने काढला सासूचा काटा; मंगळवेढा तालुक्यातील घटना

पाच एकर जमिनीसाठी जावयाने काढला सासूचा काटा; मंगळवेढा तालुक्यातील घटना

googlenewsNext

मंगळवेढा/सोलापूर : जमिनीच्या कारणावरून रागाच्या भरात जावायाने सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. 

शाकुबाई मारुती कोकरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ याच्याविरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवार २३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास यातील फिर्यादीची बहीण शाकुबाई मारूती कोकरे ही राहत्या घरी तिची मुलगी मोनाबाई, जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ व मुलगी समृध्दी व समीक्षा असे घरात झोपले असताना बहीण शाकुबाई हिचे वडील राजाराम शेजाळ यांचे नावे असलेली पाच एकर जमीन नावावर करणे करीता अंगठा का देत नाही या कारणावरून फिर्यादीच्या बहीणीचा जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ याने तिला चाकूने सपासप वार करून जिवे मारले असावे असा फिर्यादीचा संशय आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सोलापूर ग्रामीण पेालिस दलाच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी भेट दिली आहे. 

Web Title: Mother-in-law's thorn removed by son-in-law for five acres of land; Incidents in Mangalvedha Taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.