मोटारसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; ३९ मोटारसायकली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 03:03 PM2021-07-01T15:03:24+5:302021-07-01T15:05:23+5:30
सोलापूर स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी
सोलापूर - मोटारसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगारास जेरबंद करून त्याच्याकडील ३९ मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने सदर गुन्हयातील मुख्य आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली तपास पथक जिल्हयातील मोटारसायकल चोरी करणारे आरोपींच्या मागावर होते.
३० जून २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना पंढरपूर येथील एक इसमाकडे चोरीची मोटारसायकल असल्याबाबत खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती. दरम्यान पंढरपूर शहरात मालविषयी गुन्हयाचे उकल करण्याकामी पेट्रोलिंग करीत असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/अमित सिदपाटील यांच्या नेतृृत्वातील तपास पथकास सदरची मिळालेली बातमी सांगून त्यानुसार कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्यावरून पोसई/अमित सिदपाटील यांनी त्यांचे सोबत असलेले तपास पथकातील अंमलदार यांचेसह सदर मिळालेल्या बातमीनुसार एका इसमास ताब्यात घेवुन तपास करून याचे कडुन 39 दुचाकी मोटारसायकली एकुण किंमत २१ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे जप्त केले आहेत. सदर आरोपीने जिल्हयात व परजिल्हयात केलेले पुढील प्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
एकुण जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकली -39
1. सोलापूर ग्रामीण -10
2. सोलापूर शहर - 04
3. पुणे जिल्हा -11
4. सातारा - 05
5. अहमदनगर - 01
6. सांगली - 01
7. कोल्हापूर - 01
8. बीड - 01
9. इतर -05
सदर आरोपीस सध्या वळसंग पोलीस ठाणेकडील गुन्हयात वर्ग करण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षकअमित सिदपाटील, पोहवा राजेश गायकवाड, दिलीप राऊत, श्रीकांत गायकवाड, विजयकुमार भरले, सलीम बागवान, पोना हरिदास पांढरे, रवि माने, पोकाॅ सचिन गायकवाड, चालक पोना केशव पवार यांनी बजावली आहे.