संक्रांतीच्या तोंडावर बहरला गावठी आंबट बोरांचा हंगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:30 AM2020-12-30T04:30:02+5:302020-12-30T04:30:02+5:30

कोर्टी : करमाळा तालुक्यात भोवतालच्या गावांमध्ये गोड, आंबट गावरान बोरांची झाडे मोठ्या प्रमाणात असून, शेताच्या बांधावर, विहिरीच्या कडेला, आडरानावर ...

At the mouth of Sankranti, the season of Baharla village sour rains | संक्रांतीच्या तोंडावर बहरला गावठी आंबट बोरांचा हंगाम

संक्रांतीच्या तोंडावर बहरला गावठी आंबट बोरांचा हंगाम

Next

कोर्टी : करमाळा तालुक्यात भोवतालच्या गावांमध्ये गोड, आंबट गावरान बोरांची झाडे मोठ्या प्रमाणात असून, शेताच्या बांधावर, विहिरीच्या कडेला, आडरानावर खुरटी गावठी बोरं लगडून गेली आहेत. ही चव सर्वांना हवीहवीशी वाटू लागली आहे.

डिसेंबरअखेरीस ही हिरवी असलेली बोर लाल, पिवळसर होतात. आता ती खाण्यासाठी उपलब्ध झाली आहेत. मोठ्या प्रमाणात आढळून येणाऱ्या गावरान बोरांच्या झाडांना येणाऱ्या बोरांची चव सर्वांना हवीहवीशी आणि न्यारी ठरली आहेत.

यंदा मात्र गावठी बोरांचं हंगाम ऐन मकरसंक्रांतीच्या तोंडावर बहरला आहे. ही गावठी बोरे लहान थोरांपासून अगदी सगळ्यांना भुरळ घालत आहेत. संक्रांतीच्या सणात वाण म्हणून या बोराना महत्त्वाचं स्थान आहे. पुणे, मुंबई यांसारख्या शहरी बाजारातून गावरान बोरांना मोठी मागणी असल्याने ही लहान आकाराची बोरे शहरात बाजारपेठेत विक्री साठी उपलब्ध झाली आहेत. यंदा नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला असताना रब्बी तसेच खरिपातील पिकंही हातची गेली आहे. दुधासारखा पूरक व्यवसायही अडचणीचा ठरू लागला आहे, अशावेळी आडबाजूला आणि दुर्लक्षित राहिलेली गावरान बोरांची झाडेच आता शेतकऱ्यांच्या मदतीला येत आहेत.

---

बच्चे कंपनीला अधिक काळ चाखता येणार बोरं

यंदा बोराचा हंगाम जोमात बहरला आहे. गावरान बोरे हा लहानग्या साठी कायम कौतुकाचा विषय आहे. दरवर्षी शाळा सुरू असल्याने मुलांना बोरे मिळवण्यासाठी इतका वेळ मिळत नसे मात्र यंदा ग्रामीण भागातील आठवीपर्यंतच्या शाळांना सुटी असल्याने चिमुकल्यांची पावले आपोआप बोराच्या झाडाकडे वळताना दिसत आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा बच्चे कंपनीला बोराची चव अधिक काळ चाखता येणार आहे .

---

गावठी बोरांचे आहारात महत्त्व असून, चवदार गावरान. आंबट, गोड, तुरट चवीची बोरे खाल्याने पचन लवकर होते. बोरमध्ये विटामीन-सी, विटामीन-ए इत्यादी औषधी गुणधर्म असल्याने फायदाच होतो.

- डॉ रामलिंग शेटे आयुर्वेद तज्ज्ञ

---

फोटो : २९ कोर्टी

निंभोरे येथील शिवारात बहरलेली गावरान बोरांची झाडे. (छाया : अक्षय आखाडे)

Web Title: At the mouth of Sankranti, the season of Baharla village sour rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.