पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:40 AM2021-02-06T04:40:02+5:302021-02-06T04:40:02+5:30

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विवेक साळुंखे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे म्हणाले की, ...

Movement against petrol, diesel, gas price hike | पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात आंदोलन

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात आंदोलन

Next

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विवेक साळुंखे यांना देण्यात आले.

यावेळी शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे म्हणाले की, गेल्या चार वर्षांपूर्वी क्रूड तेलाचे जे दर होते तेच दर आजही कायम आहेत. तरीही देशात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. महागाईच्या या भडकणाऱ्या वणव्यातून सर्वसामान्य नागरिकांना काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे, तालुकाप्रमुख महावीर देशमुख, शहरप्रमुख रवी मुळे, जयवंतराव माने, संजय घोडके, माऊली अष्टेकर, काका बुराडे, प्रवीण शिंदे, महेश इंगोले, सुधाकर माळी, शांताराम यादव, नागेश पाटील, पोपट इंगोले, जयसिंग पवार, दामोदर ताटे, रणजित कदम, विलास चव्हाण, संजय कांबळे, शिवाजी जाधव, हरिभाऊ गाजरे, विजय करपे, कल्याण कवडे, उमेश काळे, रणजित कदम, बाळासाहेब पवार, लंकेश बुराडे, विनय वनारे, नाना सावंतराव, सचिन बंदपट्टे, तानाजी मोरे, पंकज डांगे, अरुण कांबळे, सूरज गायकवाड, विलास थोरात, बाबा अभंगराव, ईश्वर साळुंखे, गणेश वाघमारे, पूर्वा पांढरे, आरती बसवंती, संगीता पवार, रेहाना आतार आदी उपस्थित होते.

फोटो लाइन :::::::::::::::::::::::::

इंधन दरवाढ मागे घ्यावी याबाबतचे निवेदन तहसीलदार विवेक साळुंखे यांना देताना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे. महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे, महावीर देशमुख, संजय घोडके, रवी मुळे आदी.

Web Title: Movement against petrol, diesel, gas price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.