पंढरपूर जिल्हा रुग्णालयास कोविड - १९ रुग्णालय करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 01:09 PM2020-04-08T13:09:37+5:302020-04-08T13:11:25+5:30
सोलापूर आरोग्य विभागाची सतर्कता; सामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशासन सज्ज
पंढरपूर : महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव बघता आरोग्य विभागाकडून पंढरपूर जिल्हा रुग्णालयास कोविड - १९ रुग्णालय बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पंढरपूर जिल्हा रुग्णालयमध्ये रोज किमान विविध आजाराचे चारशे ते पाचशे रुग्ण उपचारासाठी येत असतात. परंतु सध्या कोरोनाग्रस्त भागातून आलेल्या लोकांची संख्या देखील पंढरपूरमध्ये अधिक आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात अधिक रुग्ण ये-जा करत आहेत.
अशा परिस्थितीतून सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले व जिल्हा शैल्य चिकिस्तक प्रदीप ढेले, जिल्हा रुग्णालय अधीक्षक जयश्री ढवळे यांनी पंढरपुरातील सर्व डॉक्टरांचे भक्तनिवास येथे बैठक घेतली आहे.
या बैठकीमध्ये उपजिल्हा रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये नफा ना तोटा या तत्वावर उपचार करण्यात देण्याचे ठरले आहे. तसेच जिल्ह्यात पुढील काळामध्ये करण्याचा प्रादुर्भाव वाढला तर केवीड - १९ दर्जाचे रुग्णालय म्हणून उपजिल्हा रुग्णालय चा वापर करण्याच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीसाठी डॉ. शितल शहा, डॉ. धीरज पाटील, डॉ. पकंज गायकवाड, डॉ. प्रदीप केचे, डॉ. सुधीर श्रिंघारे, डॉ. अनिल काळे यांच्यासह अन्य डॉक्टर उपस्थित होते.