जखमींच्या मदतीसाठी धावणार आता मृत्युंजय दूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:22 AM2021-03-31T04:22:41+5:302021-03-31T04:22:41+5:30
कुर्डूवाडी : महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यासाठी मोडनिंब महामार्ग पोलीस केंद्र वाहतूक पोलिसांच्यावतीने ...
कुर्डूवाडी : महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यासाठी मोडनिंब महामार्ग पोलीस केंद्र वाहतूक पोलिसांच्यावतीने मृत्युंजय दूताची स्थापना करण्यात आली. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार व त्या संबंधित रुग्णाला कसे हाताळावे यासाठीचे प्रशिक्षण मंगळवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयात मोडनिंब महामार्ग पोलिसांच्यावतीने देण्यात आले.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात मोडनिंब महामार्ग पोलिसांच्यावतीने हा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ भूषणकुमार उपाध्याय, महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी सज्जन वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सकाळी ११ ते १२ या वेळेत मृत्युंजय दूत कुर्डूवाडी या ग्रुपमधील सर्व सदस्यांनी व ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, डॉ. तांबोळी यांनी प्रथमोपचाराचे साहित्य व अपघातातील जखमींंना कसे हाताळावे याबाबतचे प्रशिक्षण दिले. त्याचे प्रात्यक्षिकही पार पडले. यावेळी मोडनिंब महामार्गाचे सहाय्यक फौजदार मोहन शिंदे यांनी जखमींना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी व नागरिकांनी त्यास मदत करण्याचे आहवान केले. यावेळी कुर्डूवाडी मृत्युंजय दूतमधील सर्व सदस्य उपस्थित होते.
..........
३० कुर्डूवाडी
मोडनिंब महामार्ग पोलिसांच्या वतीने अपघातातील जखमींसाठी मृत्युंजय दूत अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला. यावेळी डॉ. सुनंदा गायकवाड, सहायक फौंजदार मोहन शिंदे, डॉ. तांबोळी.