वसुलीला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:28 AM2021-02-25T04:28:11+5:302021-02-25T04:28:11+5:30
महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार व सहा. अभियंता अमित शिंदे यांच्या आदेशान्वये वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश विठ्ठल रणदिवे, कर्मचारी ...
महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार व सहा. अभियंता अमित शिंदे यांच्या आदेशान्वये वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश विठ्ठल रणदिवे, कर्मचारी शशिकांत दिघे, संतोष मोहिते, धनाजी गायकवाड, रणजित चव्हाण हे सांगोला शहरातील कोष्टी गल्लीतील वीज ग्राहक रामचंद्र गोविंद डाणके यांच्याकडे थकीत वीजबिल वसुलीसाठी गेले होते. यावेळी विनोद बाबुराव बाबर यांनी तेथे येऊन तुम्ही या भागात येऊन वीजबिल वसुली करू नका, अन्यथा एकाएकाचा पाय काढीन, अशी धमकी देवून शिवीगाळ, दमदाटी करत रामचंद्र डाणके यांना वीजबिल भरण्यास विरोध केला.
याबाबत महावितरण कंपनीचे सांगोला शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश रणदिवे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद बाबूराव बाबर (रा. सांगोला) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.