वीज बिल वसुलीला गेलेल्या महावितरणच्या अभियंत्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:23 AM2021-09-19T04:23:06+5:302021-09-19T04:23:06+5:30
सध्या महावितरणकडून थकीत वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे. यातील फिर्यादी कनिष्ठ अभियंता संदीप शिवाजी माळी (रा. सप्तशृंगीनगर, मंगळवेढा) ...
सध्या महावितरणकडून थकीत वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे. यातील फिर्यादी कनिष्ठ अभियंता संदीप शिवाजी माळी (रा. सप्तशृंगीनगर, मंगळवेढा) यांच्यासह महावितरणचे पथक थकीत वीज बिल वसुलीसाठी मरवडे येथे गेले होते. पांडुरंग जाधव याचे घरगुती वीज बिल २४ हजार ६४८ रुपये थकीत होते. त्यामुळे १५ सप्टेंबर रोजी त्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यानंतर त्याने आकडा टाकून वीजपुरवठा सुरळीत केला. शुक्रवारी दुपारी ते निदर्शनास आल्याने आकडा काढून नेताना समाधान हा तेथे आला. त्याने आकडा काढल्याचा जाब विचारत वीज बिल भरत नाही, काय करायचे ते करा, असे म्हणत कनिष्ठ अभियंता माळी यांची गच्ची धरून शिवीगाळ व दमदाटी करू लागला. कर्मचारी सूरज घुले सोडविण्यासाठी आल्यावर त्यांना मारहाण केली. त्यानंतर महावितरणच्या पथकाने थकीत वीज बिलामुळे मोहन फटे याच्या घराचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानेही महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे तपास करीत आहेत.