सार्वजनिक विहिरीत पावसाचे गढूळ पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:26 AM2021-09-15T04:26:53+5:302021-09-15T04:26:53+5:30
तीन-चार दिवसांपूर्वीच या विहिरीमध्ये मांजर पडून मृत्यू पावल्याने हे पाणी पुढील ४-५ दिवस पिण्यायोग्य स्थितीत नव्हते. भविष्यात या सर्व ...
तीन-चार दिवसांपूर्वीच या विहिरीमध्ये मांजर पडून मृत्यू पावल्याने हे पाणी पुढील ४-५ दिवस पिण्यायोग्य स्थितीत नव्हते. भविष्यात या सर्व घटना टाळण्यासाठी विहिरीला योग्य त्या उंचीचा कठडा बांधून विहिरीच्या वरील बाजूला जाळीचे आच्छादन तात्काळ बसविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ खराडे यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पुणे शहर सरचिटणीस नीता खराडे, बाळू कारंडे, बंडू सुतार आदींची उपस्थिती होती.
................
वांगी ग्रामपंचायतीने वांगी नं. ३ येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला तात्काळ योग्य त्या उंचीचा कठाडा बांधून वरून जाळी बसवून घ्यावी; अन्यथा पिण्याच्या पाण्यामधून गावात काही अपायकारक घटना घडल्यास त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल.
-सोमनाथ खराडे, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेल