मंगळसूत्र चोरीवरून अधिकार्‍यांची खरडपट्टी

By admin | Published: May 20, 2014 12:49 AM2014-05-20T00:49:23+5:302014-05-20T00:49:23+5:30

पोलीस आयुक्तांनी घेतली अचानक बैठक

Mugging the Muggle | मंगळसूत्र चोरीवरून अधिकार्‍यांची खरडपट्टी

मंगळसूत्र चोरीवरून अधिकार्‍यांची खरडपट्टी

Next

सोलापूर : घरफोडी व मंगळसूत्र चोरीच्या मालिकेमुळे लोकांमध्ये ओरड सुरू झाल्यावर पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी सोमवारी दुपारी पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेऊन झापाझापी केली. सोलापुरात गेल्या आठवड्यात नऊ व दोन दिवसात तीन मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या. चोरी व घरफोडीचे प्रकार दररोज दोन ते तीन घडत आहेत. मंगळसूत्र चोरीच्या घटनांमुळे महिला वर्गात घबराट पसरली आहे. सध्या लग्नसराईचा मोसम असल्याने महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत आहे. अशात चोरटे एकावेळी दोन ते तीन ठिकाणी डाव साधत आहेत. पण चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरू लागल्यामुळे लोकांमध्ये संताप वाढला आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्षाचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले. जुळे सोलापूर आणि स्टेशन चौकात लागोपाठ मंगळसूत्र पळविण्यात आले. घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्या मानाने गुन्हे उकल करण्याचे प्रमाण घटले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त रासकर यांनी सोमवारी दुपारी साडेचार वाजता सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यात त्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मंगळसूत्र चोरी व घरफोडीच्या घटनांचा आढावा घेतला. यात गुन्हे उघड करण्याचे प्रमाण व त्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आदींची माहिती घेतली. वारंवार घटना घडणार्‍या हद्दीत चोरट्यांवर लक्ष केंद्रीत करण्याबाबत अधिकार्‍यांना तंबी देण्यात आली.

---------

अधिकारी लागले कामाला मंगळसूत्र चोरीच्या घटनांबाबत पोलीस आयुक्त आढावा घेणार असल्याचा संदेश मिळाल्यावर सर्व पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांची धावपळ उडाली. हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा गोषवारा धुंडाळून त्यात उकल झालेल्या गुन्ह्यांचा ताळमेळ घालण्यासाठी कर्मचार्‍यांना दिवसभर कामाला लावण्यात आले होते. त्यानंतर आयुक्तालयात रात्री आठ वाजेपर्यंत बैठक चालली. सर्वांनी समस्यांचा पाढा वाचून गुन्हे शाखेकडे लक्ष वेधले.

Web Title: Mugging the Muggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.