सोलापुरातील ४८२ एकर परिसरात उभारले जाणार मल्टीपर्पज इनडोअर हॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 03:45 PM2020-10-28T15:45:43+5:302020-10-28T15:51:30+5:30

खेलो इंडियाकडून साडेचार कोटींचा निधी मंजूर : सोलापूर विद्यापीठात खेळाडूंसाठी सुविधा

A multipurpose indoor hall will be set up in 482 acres of land in Solapur | सोलापुरातील ४८२ एकर परिसरात उभारले जाणार मल्टीपर्पज इनडोअर हॉल

सोलापुरातील ४८२ एकर परिसरात उभारले जाणार मल्टीपर्पज इनडोअर हॉल

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूरच्या विद्यार्थी खेळाडूंसाठी खूप चांगले हॉल उपलब्ध होणार आहेखेळाडूंच्या उज्ज्वल करिअरसाठी होणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितलेबॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, हँडबॉल, जुदो, कबड्डी, हॉलीबॉल, टेबल टेनिस यांसह विविध प्रकारचे १५ खेळ खेळता येणार

सोलापूर : खेलो इंडिया विभागाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ४८२ एकर जागेत जागतिक दजार्चे मल्टीपर्पज इनडोअर हॉल निर्माण करण्याकरिता साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ याबाबतचे पत्र सोमवारी विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

दीड वर्षांपूर्वी सोलापूर विद्यापीठाकडून केंद्र सरकारकडे खेळाडूंसाठी मल्टीपर्पज हॉल आणि स्विमिंग टँककरिता प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राज्य शासनाची परवानगी घेऊन सदरचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाकडे देण्यात आला होता. खेलो इंडिया अभियानातून हा प्रस्ताव केंद्र शासनाने मंजूर केलेला आहे. विद्यापीठाच्या ४८२ एकर परिसरात विद्यार्थी खेळाडूंसाठी हा मल्टीपर्पज हॉल उभारला जाणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. क्रीडा विभागाचे संचालक डॉ. एस. के. पवार यांनी प्रस्ताव तयार केला होता. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनीदेखील प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न केले, अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

हॉलमध्ये हे मैदान असणार
या मल्टीपर्पज हॉलमध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, हँडबॉल, जुदो, कबड्डी, हॉलीबॉल, टेबल टेनिस यांसह विविध प्रकारचे १५ खेळ खेळता येणार आहे. जागतिक दजार्चे सुसज्ज असे मल्टीपर्पज हॉल उभारण्यात येणार असल्याचे क्रीडा संचालक डॉ. एस. के. पवार यांनी सांगितले. सोलापूरच्या विद्यार्थी खेळाडूंसाठी खूप चांगले हॉल उपलब्ध होणार आहे. याचा फायदा निश्चितच येथील विद्यार्थी खेळाडूंच्या उज्ज्वल करिअरसाठी होणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: A multipurpose indoor hall will be set up in 482 acres of land in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.