मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पुढे ढकलले, मार्चमध्ये होण्याची शक्यता
By बाळकृष्ण दोड्डी | Published: January 19, 2023 08:53 PM2023-01-19T20:53:28+5:302023-01-19T20:53:36+5:30
मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली हाेती.
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी, १९ जोनवारीला मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबई ते सोलापूर करीता वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेचे उद्घाटन होण्याची शक्यता होती. काही कारणास्तव उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता वंदे भारत एक्सप्रेस मार्च मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.
मुंबई ते सोलापूर करीता वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली हाेती. या एक्सप्रेसमुळे सोलापूर ते मुंबईचा प्रवास कमी वेळेत होणार असून अवघ्या चार ते साडे चार तासात सोलापूरकरांना मुंबईला पोहचता येईल. या गाडीकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही गाडी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. यामुळे गुरुवारी, १९ जानेवारीला वंदे भारत सुरु होईल्, अशी चर्चा होती. परंतू, रेल्वेकडून याचे नियोजन न झाल्याने उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलल्याची चर्चा आहे.