मुंबईचा बॉबी, मराठवड्यातला कुंदन अन् दक्षिणचा सारंग खरबूज भाव खातोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 05:13 PM2019-04-19T17:13:39+5:302019-04-19T17:20:00+5:30
दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात बहुतांश फळांची आवक वाढलेली असते आणि भाव उतरलेले असतात. यंदा प्रथमच विहीर, बोअर अशा स्तोत्रांना पाणी कमी झाल्याने याचा परिणाम फळ लागवडीवर झाला आहे.
काशीनाथ वाघमारे
सोलापूर : उन्हाळ्यात शरिराला थंडावा देणाºया खरबुजाची जिल्ह्यात पाण्याअभावी अत्यल्प लागवड झाली आहे़ परिणामत: सोलापुरातील बाजार पेठेत मागील वर्षाच्या तुलनेत फळाची आवक घटली आहे. त्यामुळे भावही वधारला आहे. या काळात मुंबईतून आलेला बॉबी, मराठवडयातून येणारा कुंदन आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून फळबाजारात दाखल झालेल्या जवारी सारंग अशा विविध प्रकारच्या खरबुसांचा दर काहीअंशी वाढला आहे.
दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात बहुतांश फळांची आवक वाढलेली असते आणि भाव उतरलेले असतात. यंदा प्रथमच विहीर, बोअर अशा स्तोत्रांना पाणी कमी झाल्याने याचा परिणाम फळ लागवडीवर झाला आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते सर्व प्रकारच्या पिकांमध्ये ऊस आणि पाणीदार फळांना पाणी अधिक प्रमाणात लागते़ यामुळे सोलापूर जिल्ह्यात यंदा खरबुजाची लागवड कमी झाली आहे़ परिणामत: मुंबई आणि मराठवाड्यातून या फळाची आवक झाली आहे़ मराठवाड्यात तुळजापूर येथून यंदा प्रथमच कुंदन खरबूज दाखल झाला आहे़ हाच माल जिल्ह्यातून सांगोला, मंगळवेढा, बोरामणी, वळसंग, अक्कलकोट, धोत्री येथूनही आणला गेला आहे. मागीलवर्षाप्रमाणे यंदाही मुंबई आणि जिल्ह्यात अकलूज येथून बॉबी नावाचा पिवळा धमक खरबूजाची आवक झाली आहे. सध्या बाजारात बºयापैकी उपलब्ध असलेला जवारी सारंग खरबूज दक्षिण सोलापूरमधून माळकवठे, भंडारकवठे आणि मंद्रूप येथून दाखल झाला आहे.
-----
दररोज केवळ ४ टन खरबुजाची आवक
जिल्ह्याला दक्षिण सोलापूर तालुक्यातील बºयांच गावातून खरबुजाचा पुरवठा होतो. दरवर्षी एप्रिल आणि मे मेहिन्यात दिवसाकाठी जवळपास २० टनाहून अधिक फळाची आवक होते असते़ यंदा मात्र लागवडी अभावी केवळ ४ टनच मालाची आवक आहे़ जिल्ह्यात अजून १५ टन माल तुटवडा जाणवतोय. हिच स्थिती कायम राहिली तर आवक घटणार आहे आणि त्यांचे दरही वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तवली आहे़
---
लक्ष्मी मार्केटमधील
शुक्रवारचे दर
बॉबी खरबूज (१० ते ३० रुपये)
कुंदन खरबूज (१० ते ६० रुपये)
जवारी सारंग खरबूज (४० ते ६० रुपये)
--------
खरबूजसह अनेकप्रकारची फळं पाण्याअभावी जिल्ह्यात लागवड कमी झाली आहे़ त्यांची आवक घटली आहे़ सोलापूरचा व्यापारी आता मार्केट यार्डावर अवलंबून राहू शकत नाही़ काही व्यापारी पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद आणि कर्नाटकमधून फळं शोधून निर्यात करायचा विचार करतोय़ पाण्याचे संकट सर्वांपुढे असले तरी या काळात फळंही पुरवता आली पाहिजे़ अन्यथा व्यापारही चालणार नाही़
- फरिद शेख
फळ विक्रेते