तंबाखूमुक्त शाळेचा मान मुंडफणेवाडी शाळेने पटकावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:23 AM2021-02-11T04:23:47+5:302021-02-11T04:23:47+5:30

केंद्राच्या आरोग्य विभागाने पारित केलेले सुधारित नऊ निकष तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरविले आहेत. यासाठी आरोग्य विभाग ...

Mundfanewadi School won the title of Tobacco Free School | तंबाखूमुक्त शाळेचा मान मुंडफणेवाडी शाळेने पटकावला

तंबाखूमुक्त शाळेचा मान मुंडफणेवाडी शाळेने पटकावला

Next

केंद्राच्या आरोग्य विभागाने पारित केलेले सुधारित नऊ निकष तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरविले आहेत. यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हे निकष पूर्ण करण्यासाठी पत्र काढले आहे. या पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाउंडेशनच्या जिल्हा समन्वय शुभांगी लाड, मुख्याध्यापक समीर लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील नोडल अधिकारी अर्चना वाघ यांनी तंबाखूमुक्त अभियान शाळेत राबविले.

मुंडफणेवाडी शाळेने लॉकडाऊन काळात नऊ निकष पूर्ण करून माळशिरस तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी महालिंग नकाते, केंद्रप्रमुख हर्षवर्धन नाचणे यांनी कौतुक केले.

कोट ::::::::::::

तंबाखूमुक्त शाळेसाठी दिलेले नऊ निकष पूर्ण करून तंबाखू नियंत्रणावर आधारित उपक्रम राबविले. शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखू प्रतिबंधित क्षेत्र तयार करून तंबाखू विक्री व सेवन करण्यास बंदी केली. या अभियानात मुंडफणेवाडी झेडपी शाळेने माळशिरस तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

- समीर लोणकर

मुख्याध्यापक, मुंडफणेवाडी-महाळूंग झेडपी शाळा

Web Title: Mundfanewadi School won the title of Tobacco Free School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.