बार्शी तालुक्यातील मुंगशी विद्यालयाला मनोज जरांगे-पाटील यांचे नाव

By रवींद्र देशमुख | Published: June 11, 2024 01:41 PM2024-06-11T13:41:39+5:302024-06-11T13:42:54+5:30

कोरके यांच्या जय जगदंबा शिक्षण संस्थेचा ठराव

Mungshi Vidyalaya in Barshi taluka is named after Manoj Jarange Patil | बार्शी तालुक्यातील मुंगशी विद्यालयाला मनोज जरांगे-पाटील यांचे नाव

बार्शी तालुक्यातील मुंगशी विद्यालयाला मनोज जरांगे-पाटील यांचे नाव

साेलापूर : बार्शी तालुक्यातील मुंगशी ( दहिटणे ) येथील मुंगशी विद्यालयास मनोज जरांगे पाटील यांचे नाव देण्याचा ठराव संस्थेचे अध्यक्ष डॉ कपिल कोरके यांच्या अध्यक्षते खाली मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंगशी विद्यालय या शाळेचे नाव यापुढे मनोज जरांगे पाटील विद्यालय, मुंगशी (दहिटणे) असणार आहे.
 

मुंगशी येथे १९९८ मध्ये जय जगदंबा शिक्षण संस्था सर्जापुरचे संस्थापक शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके यांनी मुंगशी विद्यालयाची स्थापना केली. या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे. सध्या विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग चालू आहे. या शाळेत मुंगशी, दहिटणे येथील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे दहावीच्या शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम आहे. 
 

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचे नाव आमच्या गावातील शाळेला देऊन मुंगशी गावाची महाराष्ट्रात मान उंचावली असून आम्हा ग्रामस्थांना याचा सार्थ अभिमान आहे.
आशिष क्षीरसागर,
उपसरपंच, मुंगशी
 

मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा समाजासाठी फार मोठे योगदान आहे. कोणत्याही समाजाला न दुखावता त्यांचे आंदोलन सुरू आहे. वैराग भागात मराठा समाजाचे आंदोलन जिवंत ठेवण्याचे काम सर्वांना बरोबर घेऊन आम्ही केले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या आदेशाने आम्ही कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर गेलो नव्हतो. त्यांचं नाव मुंगशी विद्यालयाला देण्याचा ठराव केला आहे.
डॉ. कपिल कोरके,
अध्यक्ष, जय जगदंबा शिक्षण संस्था, सर्जापूर

Web Title: Mungshi Vidyalaya in Barshi taluka is named after Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.