सायकल ट्रॅकसाठी सोलापुरातील ४४ जणांना महापालिकेच्या नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:54 AM2018-11-28T10:54:48+5:302018-11-28T10:56:26+5:30
माजी आमदार दिलीप माने, राम रेड्डीसह अन्य बड्या व्यक्तींचा समावेश
सोलापूर : मंजूर विकास आराखड्यानुसार होटगी रोडवरील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला सहा-सहा मीटर जागा न सोडणाºया ४४ मिळकतधारकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये काँग्रेस नेते दिलीप माने, उद्योजक राम रेड्डी यांच्यासह अनेक मंडळींच्या मालमत्तांचा समावेश आहे.
स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते विमानतळ यादरम्यान सायकल ट्रॅक करण्याचे नियोजन आहे. मंजूर विकास आराखड्यानुसार मिळकतदारांनी बांधकाम करताना मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला सहा-सहा मीटर जागा सोडणे अपेक्षित आहे. अनेक मिळकतदारांनी ही जागा सोडली नसल्याचे लक्षात आले आहे.
सायकल ट्रॅकच्या कामाचे नियोजन सुरू झाल्यानंतर मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पुन्हा या कामाची माहिती घेतली. मिळकतदारांना नोटिसा बजावून बांधकाम हटविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार बांधकाम विभागाने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. सायकल ट्रॅकचे काम लवकर सुरू होणार नाही. पण तत्पूर्वी येथे वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. विजापूर रोडवरील मिळकतधारकांनाही नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
सहकारमंत्र्यांच्या नोटिशीबाबत अधिकाºयांमध्ये चर्चा
- होटगी रोडवरील मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात दुजाभाव होत असल्याचा मुद्दा सोमवारी मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे उपस्थित झाला होता. यानंतर आयुक्तांनी बांधकाम अधिकाºयांना फोन करुन सूचना केल्या होत्या. बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घराच्या बांधकामाचा विषय राजकीय आहे. त्यात आम्हाला ओढू नका. मुळात या बांधकामाला महापालिकेने परवानगी दिलेली नाही. विषय मंत्रालयात सुरू आहे. त्यामुळे त्यांना सहा मीटर जागा सोडण्यासंदर्भात नोटीस द्यायची की नाही याची चर्चा बांधकाम विभागात सुरू आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी मार्गदर्शन केल्यानंतर नोटिशीबाबत निर्णय होईल.
यांना दिल्या नोटिसा
- सुभाष सावस्कर, विजय सावस्कर, ओमप्रकाश दोडमनी, दिलीप माने, जयदेवी स्वामी, प्रमिला देवी, विनोद भनेजा, गंगाधर खटावकर, राम रेड्डी, विमलाताई बावळे, सुनीता देवकते, औदुंबर वाघचवरे, अनिल येरटे, एअरटेल आॅफिसचे साळुंखे, अलीम शेख, मॉर्डन सोल्युशनचे पिरजादे, दिलीप वाघमारे, विक्रम वाघमारे, जे.एम. पट्टणशेट्टी, विजयकुमार पाटील, सिध्दलिंग गौडा-पाटील, ज्ञानेश्वर तेरखेडकर, विजय केळकर, सचिन जोग, मोतिलाल सदारंगानी, दीपाली मादगुंडी, प्रमोदिनी आलबाळ, संजय गौडनवरु, संजय लिगाडे, अश्विनी लवटे, सुहास डोईजोडे, शैलेश इंगळे, सुलोचना भिसे, लक्ष्मीबाई भिसे.