सोलापुरातील सीमोल्लंघनासाठी महापालिकेचा 'ॲक्शन प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
By Appasaheb.patil | Published: October 1, 2022 06:07 PM2022-10-01T18:07:25+5:302022-10-01T18:07:25+5:30
सोलापूर लोकमत न्युज
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पार्क चौक येथे शमीच्या वृक्षाच्या झाडाच्या आजूबाजूला अतिक्रमण काढण्यात आले असून त्या ठिकाणी विजय दशमी दिवशी येणाऱ्या पालख्या व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अडथळे होऊन नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात आले.
आज महापालिका आयुक्त पि. शिवशंकर,पोलीस आयुक्त राजेंद्र माने, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त विक्रमसिंह पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे, पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, प्रवीण दंतकाळे आदींनी पार्क चौक येथील शमीच्या झाडाभोवती चालू असलेल्या कामाची पाहणी करून ५ सप्टेंबर रोजी सीमोल्लंघन येणाऱ्या भाविकांची व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात येईल यावर चर्चा केली.
दरम्यान सीमोल्लंघन दिवशी देवी भक्तांना धार्मिक विधी व्यवस्थित पार पाडण्याकरिता मदत व्हावी कोणत्याही अडथळ्याशिवाय देवी भक्तांना सीमोल्लंघन विधी करण्यात यावे. याकरिता नियोजन करण्यात आले. असून चार हुतात्मा पुतळ्याच्या बाजूने देवीभक्त प्रवेश करतील तर पार्क चौक येथील टेबल टेनिस पत्रकार संघाच्या बाजूने ते बाहेर पडतील असे नियोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. तसेच त्या ठिकाणी असलेले व्यापाऱ्यांच्या गाड्या ५ ऑक्टोबर च्या आत काढण्यासंदर्भात ही यावेळी चर्चा करण्यात आली.