एक तारखेला पगार देण्यासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:26 AM2021-08-12T04:26:26+5:302021-08-12T04:26:26+5:30
राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत मुख्यमंत्री व प्रधान सचिव यांच्याबरोबर दोनवेळा बैठक होऊनही शासनाने कोणताच निर्णय जाहीर केला नसल्याने पुणे ...
राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत मुख्यमंत्री व प्रधान सचिव यांच्याबरोबर दोनवेळा बैठक होऊनही शासनाने कोणताच निर्णय जाहीर केला नसल्याने पुणे विभागीय नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीने जाहीर केल्याप्रमाणे हे आंदोलन केले आहे.
यावेळी प्रत्येक महिन्याचा पगार १ तारखेला मिळावा, ७ व्या वेतन आयोगातील फरकाचे हप्ते मिळावेत, अनुकंपाची भरती त्वरित करावी, आश्वासित प्रगती योजना त्वरित लागू करून फरकाची रक्कम मिळावी, सेवेतील कर्मचारी निधन १० लाखाचे सानुग्रह अनुदान वारसास मिळावे आदी मागण्या करून याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांना देण्यात आले.
यावेळी न.पा. कामगार संघ अध्यक्ष नागेश अक्कलकोटे, माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, केदारनाथ वेताळ, शब्बीर वस्ताद, शिवाजी कांबळे, भगवान बोकेफोडे, आप्पा राऊत, राजू चोपडे, विनोद जगताप, नितीन शेंडगे, मनीषा हराळे, कुसुम ठोकळ, सारिका कुदळे, ज्योती कदम, सुनीता बुगडे आदी पदाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
----
फोटो : १० बार्शी
बार्शी नगरपरिषद येथे विविध मागण्यांसाठी दोन तास आंदोलन करताना कर्मचारी.