लग्नाचे आमिष दाखवून कपडे, मंगळसूत्र खरेदी करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:22 AM2021-04-04T04:22:34+5:302021-04-04T04:22:34+5:30

हिरोळी ता.आळंद जि. कलबुर्गी येथील मयत नागप्पा वाडेद व आरोपी मल्लिनाथ वाडेद सख्ये चुलत भाऊ आहेत. हिरोळी शिवारात ...

Murder by buying clothes, Mangalsutra by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून कपडे, मंगळसूत्र खरेदी करून खून

लग्नाचे आमिष दाखवून कपडे, मंगळसूत्र खरेदी करून खून

googlenewsNext

हिरोळी ता.आळंद जि. कलबुर्गी येथील मयत नागप्पा वाडेद व आरोपी मल्लिनाथ वाडेद सख्ये चुलत भाऊ आहेत. हिरोळी शिवारात एकमेकाला शेजारी शेत जमीन आहे. दोन्ही कुटुंबाचे गेल्या २५ वर्षांपासून वहिवाट रस्ता, बांधाच्या कारणावरून वाद आहेत. अखेर नागप्पाला खंडाने शेतजमीन लावून मल्लिनाथ अक्कलकोट येथील एका शेतकऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून आला. दरम्यान मल्लिनाथ हा नागप्पाबरोबर गोडीने राहत होता. काही दिवसांपूर्वी नागप्पाच्या पत्नीचे निधन झाले.

त्यानंतर खून करण्याचा कट रचून नागप्पाला तुझं लग्न लावून देतो. अक्कलकोट येथे एक मुलगी बघितली आहे. असे सांगून तिघांनी नागप्पास ३० मार्च रोजी हिरोळीहून अक्कलकोट येथे आणले. लग्नासाठी कपडे, मंगळसूत्रसह अन्य वस्तू खरेदी केल्या. संध्याकाळी मल्लिनाथ राहत असलेल्य शेतात मुक्कामी गेले. तेव्हा नागप्पाने मुलगी कुठे आहे, असे विचारले असता, उद्या सगळेजण येणार असल्याचे सांगितले

दरम्यान रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नागप्पा यास गाफिल ठेवून धारदार कुऱ्हाडीने ठार केले. त्यानंतर शरीराचे तुकडेतुकडे करून दोन पोत्यात भरले. नंतर जवळीक भरमशेट्टी यांच्या घाण पाणीच्या विहिरीत टाकले.

त्यानंतर काम फत्ते झाले म्हणून नागप्पा बरोबर आलेले लोक हिरोळी येथे निघून गेले. मल्लिनाथ हा येथेच शेतवस्तीवर राहिला. या घटनेचा तपास तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक इंदुमती जाधव, सर्कल इन्स्पेक्टर एस. मंजुनाथ, पोलीस उपनिरीक्षक महांतेश पाटील हे पथक करीत होते.

खुनाचा प्रकार असा झाला उघडकीस

नागप्पा यास अक्कलकोटला जा्ण्यापूर्वी आई, बहीण यांनी तू जाऊ नकोस म्हणून सांगितले होते. त्याकडे दुर्लक्ष करून तो गेला. घेऊन जाणाऱ्यांची माहिती त्याच्या आईला होती. खून झालेल्या दिवशी आईने फोन करण्याचा प्रयत्न केला पण तो लागला नाही. त्यावरून सकाळी मादन हिप्परगा येथे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तेव्हा पोलिसांनी सोबत गेलेल्या संशयित म्हणून गांधारबाई नावाच्या महिलेला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला. तेव्हा सर्व माहिती उघडकीस आली. या घटनेतील आरोपी मल्लिनाथ वाडेद, त्याची पत्नी नागम्मा, मदत करणारी गांधारबाई हणमंत तोरणगी, बसवराज वाडेद, हणमंत बेळळीकट्टी या पाच जणांना अटक करून कलबुर्गी येथील न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.

फोटो

०३अक्कलकोट

ओळी

हिरोळी येथील पाच आरोपींसह आळंद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी.

Web Title: Murder by buying clothes, Mangalsutra by showing the lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.