अपहरण झालेल्या त्या मुलाची हत्या, मृतदेह ताब्यास घेण्यास नातेवाईकांचा नकार, माचणूर येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 04:39 PM2018-11-01T16:39:40+5:302018-11-01T16:44:22+5:30
मंगळवेढा : माचणूर येथून अपहरण झालेल्या प्रतीक शिवशरण या नऊ वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या झाल्याचे गुरुवारी दुपारी उघडकीस आले ...
मंगळवेढा : माचणूर येथून अपहरण झालेल्या प्रतीक शिवशरण या नऊ वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या झाल्याचे गुरुवारी दुपारी उघडकीस आले असून त्याचा मृतदेह गावालगत असणाºया महादेव डोके यांच्या उसाच्या शेतात शेळ्या राखणाºया एका महिलेला आढळून आला या बालकाची निर्घृण हत्या करण्यात आली असून कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे़ त्याच्या मारेकºयांना जो पर्यत ताब्यात घेणार नाही तोपर्यत अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांनी जंगजंग पछाडत त्या अपहरण झालेल्या प्रतीक चा शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला मात्र कोणताही सुगावा हाती लागत नव्हता गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला असून घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रतिक च्या शरीरावर जखमा आहेत.
दरम्यान ही घटना उघडकीस आल्यामुळे तालुकाभर खळबळ माजली आहे दरम्यान मयत कुटुंबीयांनी प्रयत्नात घेण्यास नकार दिला असून पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे प्रतीक चा बळी गेल्याची भावना संतप्त कुटुंबियाकडून व्यक्त होत आहे आरोपींचा शोध घेऊन अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
दरम्यान ही घटना समजल्यापासून माचनूर व परिसरात शोककळा पसरली होती़ माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण या नऊ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना पाच दिवसांपूर्वी घडली होती. शनिवारी तो सकाळी शाळा असल्याने शाळा संपल्यानंतर घरी आला नंतर सायंकाळी पाचच्या सुमारास बाहेर खेळण्यासाठी गेला तो घरी आला नाही म्हणून अज्ञात इसमा विरोधात भादवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला होता