चारित्र्याच्या संशयावरून झोपेतील पत्नीचा खून; नातेवाइकांआधीच रात्रीत उरकला अंत्यसंस्कार

By काशिनाथ वाघमारे | Published: June 24, 2024 11:17 PM2024-06-24T23:17:04+5:302024-06-24T23:17:59+5:30

मेव्हुण्याची फिर्याद : पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा

murder of wife in her sleep on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून झोपेतील पत्नीचा खून; नातेवाइकांआधीच रात्रीत उरकला अंत्यसंस्कार

चारित्र्याच्या संशयावरून झोपेतील पत्नीचा खून; नातेवाइकांआधीच रात्रीत उरकला अंत्यसंस्कार

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात तेलगाव भीमा येथे झोपेत असलेल्या पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

भाग्यश्री बसवराज कोळी (सर्व रा. तेलगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत कोळी यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी पती बसवराज आडव्याप्पा कोळी, शिवानंद आडव्यापा कोळी व गजानन आडव्याप्पा कोळी (सर्व रा. तेलगाव) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तेलगाव येथील आरोपीचा भाग्यश्रीसोबत २०१४ साली विवाह झाला होता. त्यांना मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये झाली. मागील दोन वर्षांपासून आरोपीचे कुटुंब निम्बर्गीतील शेतात राहत होते.

काही दिवसांपूर्वी सासरवाडी लोणी येथे जाऊन आरोपी हा पत्नी काही काम करत नाही, ऐकत नाही, नेहमी भांडत असल्याचे सांगत होता. तसेच ती कोणासोबत तरी फोनवर बोलते व भेटते असे सांगत तिच्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात सारखी भांडणं होत होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.
२२ जून रोजी आरोपी पतीने फिर्यादी मेव्हुणा याला तेलगाव येथे बोलविले. त्याने तुझी बहीण भाग्यश्री हिचे चारित्र चांगले नाही. तिचे निंबर्गी येथील एका व्यक्तीसोबत संबंध असून, तिच्याकडे मोबाइल आहे. मागितले असता ती मोबाइल बाबत काही एक सांगत नाही. तिच्या जवळील मोबाइल काढून घे, असे सांगताच त्याने तिच्याकडील मोबाइल काढून दिले.

रविवारी, २३ जून २०२४ रोजी रात्री जेवण करून झोपल्यानंतर आरोपीने डोक्यात दगड घालून झोपेतच पत्नीचा खून केला. याची माहिती लोणी येथे लहान भावाला दिली. त्याने फिर्यादीला याची माहिती दिली. या घटनेनंतर फिर्यादी आई-वडील आणि भावांना याची माहिती देऊन तेलगावकडे निघाला. दरम्यान, आरोपींनी मयत भाग्यश्रीवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले. अधिक तपास मंद्रूपचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत.

Web Title: murder of wife in her sleep on suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.