चारित्र्याच्या संशयावरून सिध्दापुरात पत्नीची हत्या, पती गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:57 AM2019-01-15T10:57:09+5:302019-01-15T10:58:04+5:30

मंगळवेढा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सिद्धापूर (ता. मंगळवेढा) येथे घडली. तपकिरी शेटफळ (ता. पंढरपूर) ...

The murder of the wife in Siddapur, husband Gajaad, suspected of character | चारित्र्याच्या संशयावरून सिध्दापुरात पत्नीची हत्या, पती गजाआड

चारित्र्याच्या संशयावरून सिध्दापुरात पत्नीची हत्या, पती गजाआड

Next
ठळक मुद्देचारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सिद्धापूर (ता. मंगळवेढा) येथे घडलीऊसतोड कामगार संतोष बाळू मासाळ याने धारदार शस्त्राने आपली पत्नी शिवानीवर वार करून हत्या केली

मंगळवेढा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सिद्धापूर (ता. मंगळवेढा) येथे घडली. तपकिरी शेटफळ (ता. पंढरपूर) येथील ऊसतोड कामगार संतोष बाळू मासाळ याने धारदार शस्त्राने आपली पत्नी शिवानीवर वार करून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी संतोष मासाळ याच्यावर गुन्हा दाखल करून सोमवारी अटक केली आहे. 

पती संतोष मासाळ याने फिर्यादी दशरथ सुळे यांच्या मोबाईल नंबरवर फोन करून तुझी बहीण शिवानी दुसºयासोबत आहे, दुसºया संगे जाते. असा चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. मयत शिवानी ही ऊसटोळीतील एकासोबत बोलताना पाहिले म्हणून रागापोटी तिला मोटरसायकलवर घेऊन सिद्धापूर येथे उसाच्या शेतात उसाने मारले व मंगळवेढा येथे जाताना मोटरसायकल अपघात घडला असून, फिर्यादीची बहीण मयत शिवानी ही अपघातात जखमी झाली, अशी खोटी माहिती देऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले होते. दरम्यान, शिवानीचा उपचारादरम्यान १० जानेवारी रोजी मृत्यू झाला.

फिर्यादीची बहीण शिवानी हिला पती संतोष याने उसाने मारहाण करून तिच्या डोक्यास उसाने व कोणत्यातरी अज्ञात धारदार शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी करून तिला जिवे ठार मारले असल्याची फिर्याद दशरथ बालाजी सुळे यांनी दिली आहे.चौकशीअंति शिवानीचा पती संतोष मासाळ याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The murder of the wife in Siddapur, husband Gajaad, suspected of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.