नियम मोडत कासेगाव शिवारात मुरूम, खडीचे उत्खनन; शेतकºयांच्या बोअर, विहिरी आटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:42 PM2019-01-11T12:42:05+5:302019-01-11T12:43:46+5:30

प्रभू पुजारी/मोहन डावरे  पंढरपूर : सांगोला-पंढरपूर या मार्गाचे दोन पदरीकरण व काँक्रिटीकरण सुरू आहे. ठेकेदाराने या रस्त्याच्या कामासाठी कासेगाव ...

Murmur, Khadhi excavation at Kasegaon Shivar; Boar of wells, wells, wells | नियम मोडत कासेगाव शिवारात मुरूम, खडीचे उत्खनन; शेतकºयांच्या बोअर, विहिरी आटल्या

नियम मोडत कासेगाव शिवारात मुरूम, खडीचे उत्खनन; शेतकºयांच्या बोअर, विहिरी आटल्या

Next
ठळक मुद्देसांगोला-पंढरपूर या मार्गाचे दोन पदरीकरण व काँक्रिटीकरण सुरूनियम, अटी धाब्यावर बसवत नियमापेक्षा कित्येक पटीने जादा मुरुम, दगडाचे उत्खननधुळीमुळे उभी पिके उद्ध्वस्त होऊन कोट्यवधींचे नुकसान

प्रभू पुजारी/मोहन डावरे 

पंढरपूर : सांगोला-पंढरपूर या मार्गाचे दोन पदरीकरण व काँक्रिटीकरण सुरू आहे. ठेकेदाराने या रस्त्याच्या कामासाठी कासेगाव शिवारातील गट नं़ १५७, १५८ मधून मुरुम व खडीसाठी दगडाचे उत्खनन करण्याची परवानगी घेतली होती; मात्र त्यासाठी महसूल विभागाने घालून दिलेले सर्व नियम, अटी धाब्यावर बसवत नियमापेक्षा कित्येक पटीने जादा मुरुम, दगडाचे उत्खनन केले आहे. परिसरातील अनेक शेतकºयांच्या बोअर व विहिरी आटल्या आहेत़ तसेच धुळीमुळे उभी पिके उद्ध्वस्त होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले़ शिवाय शासनाला कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले.

पंढरपूर-सांगोला मार्गाच्या रस्त्याचे काम आऱ के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मिळाले आहे़ त्यामुळे या  रस्त्याला लागणारी खडी व मुरुमासाठी ठेकेदाराने कासेगाव शिवारातील गट नं़ १५७, १५८ मधून उत्खनन करण्याची परवानगी घेतली आहे, परंतु महसूल प्रशासनाने घालून दिलेले नियम या ठेकेदाराने पाळले नाहीत़ नियमबाह्य, बेकायदेशीर दगड व मुरुमाचे उत्खनन करत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला आहे. शिवाय परिसरातील शेतकºयांच्या बोअर, विहिरी आटल्या़ धुळीमुळे पिकांचे नुकसान झाले़ त्यामुळे या कंपनीच्या विरोधात परिसरातील शेतकरी, विविध संघटनांच्या तक्रारी महसूल प्रशासनाकडे आल्या़ त्यानंतरही महसूल विभागाने कारवाई करण्यास चालढकल केली.

नियमापेक्षा जास्त व खोल उत्खनन केल्यामुळे मोठमोठे खड्डे पडून जमिनीला पाणी लागले आहे़ या पाण्यामुळे परिसरातील अनेक शेतकºयांच्या विहिरी व बोअर यांची पाणीपातळी खालावली आहे तर काहींची पूर्णच बंद झाली आहे. पिके उद्ध्वस्त झाल्यानंतर महसूल प्रशासनाने कंपनीवर दंडात्मक  कारवाई करत शेतकºयांना नुकसानभरपाई देणे गरजेचे होते; मात्र महसूलकडून कागदी घोडे  नाचवत कारवाईचा फार्स सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सामाजिक संघटना  आक्रमक होत उपोषणाच्या तयारीत आहेत. 

आऱ के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरचे साईराज पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही़

रातोरात दोन खडी क्रशर हलविले
- कासेगाव येथील शेतकºयांच्या तक्रारी, सामाजिक संघटनांनी उपोषणाचा इशारा दिल्याने प्रशासनावर कारवाईसाठी दबाव वाढला़ त्यानंतर कंपनीने दोन खडी क्रशर रातोरात गायब करण्यात यश मिळविले आहे; मात्र या ठिकाणी हजारो ब्रास खडी, दगड तसेच पडून आहेत, परंतु याठिकाणच्या सर्व भागाचे, अधिकाºयांच्या भेटी, पंचनामे याचे सर्व चित्रीकरण तक्रारदाराकडे आहे, त्यामुळे महसूल अधिकाºयांसह कंपनीची गोची झाली आहे. 

कासेगाव शिवारात बेकायदेशीर खडी उत्खनन झाल्याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे, मात्र नक्की कारवाई काय झाली हे मला सांगता येणार नाही. तुम्ही गौण खनिजचे लिपिक मोमीन यांच्याशी संपर्क साधा ते अधिक माहिती देतील.
- रामचंद्र शिंदे, अपर जिल्हाधिकारी


तक्रारीवरून या ठिकाणचे दगड, मुरुमाचे किती, कसे उत्खनन केले याची ईटीएस मशीनद्वारे मोजणी सुरू आहे़ त्याचा अहवाल आल्यानंतर कोणत्या स्वरूपात कारवाई करायची हे निश्चित होईल. 
- जे़ एम़ मोमीन, लिपिक, गौण खनिज विभाग पंढरपूर

Web Title: Murmur, Khadhi excavation at Kasegaon Shivar; Boar of wells, wells, wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.