आगळगाव, कांदलगाव परिसरात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:22 AM2021-09-13T04:22:07+5:302021-09-13T04:22:07+5:30

बार्शी : बार्शी तालुक्यासाठी यंदाचा पावसाळा हा नुकसानकारक ठरत आहे. मुळात पहिल्या तीन महिन्यांत सरासरीच्या १२५ टक्के पाऊस झाला ...

Musaldhar in Agalgaon, Kandalgaon area | आगळगाव, कांदलगाव परिसरात मुसळधार

आगळगाव, कांदलगाव परिसरात मुसळधार

Next

बार्शी : बार्शी तालुक्यासाठी यंदाचा पावसाळा हा नुकसानकारक ठरत आहे. मुळात पहिल्या तीन महिन्यांत सरासरीच्या १२५ टक्के पाऊस झाला असताना आज तीन-चार दिवसांच्या विश्रांतीनंतर ग्रामीण भागातील कांदलगाव,देवगाव, आगळगाव, शेलगाव, धस पिंपळगाव, खडकलगाव आदी भागात शनिवारी रात्री पावणेआठ ते नऊच्या दरम्यान मेघगर्जना व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.

या पावसामुळे खरीप हंगामातील कांदा, सोयाबीन या पिकांसह काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या उडीद पिकाला मोठा फटका बसला आहे. मागील आठवड्यातही आगळगाव मंडळात सर्वाधिक ७० मिमी पाऊस एका रात्रीत पडला होता. त्यामुळे चांदणी नदीला महापूर आला होता. आता कुठे पाणी कमी झाले होते. तोवर आणखी पाऊस सुरू झाला. या पावसामुळे उडीद उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या उडदाला कोंब आले आहेत. शेतात मळणीसाठी यंत्रही चिखल असल्याने घेऊन जाता येत नाही.

---

चांदणी नदी तुडुंब

चांदणी नदी तुडुंब भरून वाहत असल्याने धस पिंपळगाव, कंदलगाव, चुंब आदी गावातील पूल पाण्याखाली जात असल्याने नागरिकांचीही मोठी अडचण होत आहे. त्यात वरील बाजूचा बाभूळगाव मध्यम आणि कळंबवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प ही भरले आहेत. त्यामुळे पाणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Musaldhar in Agalgaon, Kandalgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.