आश्यर्चम्; सोलापुरातील अवलियाने छतावर फुलवली पालेभाज्यांची बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 02:34 PM2019-12-30T14:34:59+5:302019-12-30T14:39:18+5:30
छोट्या गोष्टीतून मोठा आनंद; अवलिया आरोग्य अधिकाºयाचा अभिनव प्रयत्न
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : गावाकडील शेती प्रयोग अस्वस्थ करत़़़ आरोग्य क्षेत्रातून रुग्णांची सेवा करता करता घरीच गच्चीवर पालेभाज्यांची परसबाग फुलवण्याची कल्पना सुचली़़़ या कल्पनेला मूर्त रूप दिले़़़ शुद्ध, रासायनिक खतविरहित भाजीपाला घरच्या घरीच खायला मिळतो आहे़़़ आज वर्षभरातील चार महिन्यांचा पालेभाज्यांचा प्रश्न सुटला आहे़.
भगवान भुसारी असे त्या अवलिया आरोग्य अधिकाºयाचे नाव़ सध्या ते शासकीय रुग्णालयात जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत़ बुलडाण्यातून नोकरीनिमित्त भुसारी यांचे वडील सोलापुरात स्थायिक झाले़ गावाकडे त्यांना शेतीचे वेड होत़े येथे आल्यानंतरही भुसारी कुटुंबाला स्वस्थ बसवू देत नसत़ या कुटुंबाला शेतीतील प्रयोगाचे वेड आहे़ मात्र सोलापुरात आकाशवाणी परिसरात इनमिन ८०० स्क्वेअर फुटात घर उभारले आणि या घरावरच भगवान आणि त्यांच्या पत्नी गोदावरी यांना पालेभाज्यांचा प्रयोग सुचला़ दोघांनी मिळून काळी माती आणली़ काही कुंड्या आणल्या़ तसेच लागणारी काही साधने जमवली़ दोघांच्या प्रयत्नातून तीन महिन्यांत पालेभाज्यांची बाग फुलवली़ या कुंड्यांमध्ये पालेभाज्यांची लागवड केली़ या कल्पनेतून किमान चार महिने पुरेल इतक्या पालेभाज्या झाल्या आहेत.
टेरेसवर, बंगल्याच्या साईड मार्जिनमध्ये आणि परसबागेसाठी जागा असेल तर तेथेही किचन गार्डन विकसित करण्याचा ट्रेंड वाढत आहे़ थोडी जागा असेल तर पाच-सहा जणांच्या कुटुंबाला पुरेल इतका भाजीपाला घरीच पिकवता येतो़ शिवाय बाग फुलवण्याचे समाधानही लाभते आहे़
१२ प्रकारच्या पालेभाज्या...
घराच्या गच्चीवर परसबाग करण्यासाठी वॉटरप्रूफिंगचे काम करवून घेतले़ त्यावर पॉलिथीन अंथरुन गांडूळखत, कंपोस्ट खत यांचे मिश्रण मातीच्या कुं ड्यात भरुन पालेभाज्या लावल्या़ मेथी, कांदा, मिरची, कोथिंबीर, भोपळा, वांगी, कांदे, टोमॅटो, लाल भेंडी, काकडीसह १२ प्रकारच्या पालेभाज्या लावल्या आहेत़ भगवान भुसारी हे सकाळी या गच्चीवर पालेभाज्यांची देखभाल करतात़ त्यानंतर त्यांच्या पत्नी पाणी, गावरान खते घालताहेत़ या परसबागेमुळे घराची शोभा तर वाढली आहे़ घरातील लहान मुलांना वनस्पतींच्या लागवडीविषयी, उपयुक्ततेविषयी माहिती मिळते आहे.
शहरी भागात रासायनिक फवारण्यांव्यतरिक्त पालेभाज्या, फळभाज्या पाहायला मिळत नाहीत़ गावाकडची शेती शांत बसू देत नाही़ तोच प्रयोग सोलापूर शहरात गच्चीवर केला आणि तो यशस्वी ठरला़ आज किमान चार महिने पुरेल इतक्या पालेभाज्या उपलब्ध झाल्या आहेत़ आरोग्याचा विचार करता नैसर्गिक पालेभाज्या घरबसल्या मिळवत आहे़ हाच प्रयोग परिसरात इतर काही लोक करताहेत़ त्यांनाही मदत करत आहे.
- भगवान भुसारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डाप्को