पतीने मारहाण केल्यामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 02:22 PM2019-07-10T14:22:07+5:302019-07-10T14:24:28+5:30

आईची तक्रार; पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

My daughter dies due to husband's assault | पतीने मारहाण केल्यामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू

पतीने मारहाण केल्यामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे- अकलूज येथील संयुक्ता नगरातील घटना- सासरच्या लोकांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी- पोलीस तपास सुरू, शासकीय रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील संयुक्ता नगरात राहणाºया पूजा सचिन व्यवहारे (वय २१) हिचा मृत्यू पतीने केलेल्या मारहाणीमुळे झाला आहे, असा आरोप  करत आईने त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकारांशी बोलताना केली.

पूजा हिचा विवाह २६ एप्रिल २०१८ रोजी अकलूज येथील सचिन व्यवहारे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर पती सचिन हा पूजा हिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. याबाबत पूजाने आपल्या आईला सांगितले होते. पूजा हिला घरात उपाशी ठेवत होता. १ महिन्यापूर्वी पूजाची आई सहिता सूर्यकांत पानबुडे (रा़ रत्नदीप हाऊसिंग सोसायटी विकास नगर, यलगुलवार शाळेजवळ सोलापूर) यांना फोन आला होता. फोनवर तिने आईला सासरचे लोक त्रास देत असल्याचं सांगितलं होतं.

आई मला घेऊन चल तिथं खूप त्रास होत आहे, मला मारहाण होत आहे असं पूजा न आईला सांगितलं होतं. २५ जून २०१९ रोजी मुलीच्या माहेरून फोन. फोनवर तुमच्या मुलीला अ‍ॅडमिट केला आहे, तुम्ही अकलूजला या असा निरोप आईला देण्यात आला. आई सहिता पानबुडे या भाऊ व बहीण दोघांना सोबत घेऊन अकलूजकडे जात होत्या. दरम्यान पंढरपुरात त्यांना थांबवण्यात आलं. पूजा हिला पंढरपुरातून सोलापुरातील सीएनएस या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान पूजा व्यवहारे हिचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. हा मृत्यू पतीने केलेल्या मारहाणीमुळे व दररोज दिलेल्या मानसिक त्रासामुळे झाला आहे. सचिन व्यवहारे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पूजाची आई सहिता पानबुडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

Web Title: My daughter dies due to husband's assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.