माझी शेती माझा सातबारा, मीच लिहिणार माझा पीकपेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:26 AM2021-09-05T04:26:47+5:302021-09-05T04:26:47+5:30
गावपातळीवरून पीकपेरणी अहवालाची खरोखर व वास्तववादी माहिती संकलित व्हावी, ही माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा ...
गावपातळीवरून पीकपेरणी अहवालाची खरोखर व वास्तववादी माहिती संकलित व्हावी, ही माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे, या हेतूने पीक पेरणीबाबतची माहिती ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे सातबारा उताऱ्यामध्ये नोंदविण्याची सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिली आहे.
माचणूर, तामदर्डी, राहटेवाडी व परिसरात शेताच्या बांधावर जाऊन ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपद्वारे पीक पाहणीच्या नोंदी मोबाइलमध्ये घेतल्या जात आहेत. ई-पीक पाहणी मोहिमेत सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे महसूल विभागाने आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने माचणूर तलाठी विनोद बनसोडे, कृषी सहायक कल्ले, कोतवाल संजय कुरवडे यांच्या उपस्थितीत शेतीच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी माहिती भरण्यात येत आहे.
फोटो ओळी ::::::::::::::
तामदर्डी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पेरणी नोंदबाबत माहिती देताना तलाठी विनोद बनसोडे, कृषी सहायक कल्ले, संजय कुरवडे व शेतकरी.