करकंबमध्ये भीषण अपघातात माय-लेकराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 01:01 PM2018-04-26T13:01:37+5:302018-04-26T13:01:37+5:30
करकंब-टेंभुर्णी रोडवर खंडोबा मंदिराजवळ एसटी बस (एमएच-०६-एस- ८०८२) आणि दुचाकी (एमएच- १४-एएन-२८८५) यांची समोरासमोर धडक झाली.
करकंब : करकंब-टेंभुर्णी रोडवर खंडोबा मंदिराजवळ एसटी बस (एमएच-०६-एस- ८०८२) आणि दुचाकी (एमएच- १४-एएन-२८८५) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील माय लेकराचा जागीच मृत्यू झाला तर, एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमी मुलीला उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भूषण भारत गायकवाड (वय २१) आणि उषा भारत गायकवाड (वय, ३५) अशी अपघातात मृत्यू झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. तर मृणाली भारत गायकवाड (वय, १७) असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, करकंब-टेंभुर्णी रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू असून, रस्त्यावर खडी व खड्डे आहेत. रस्त्यावरील खडी आणि खड्ड्यामुळे गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला असल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. अपघाताची माहिती मिळताच करकंब येथील ग्रा. पं. सदस्य सतीश माने आणि ग्रामस्थांनी जखमीला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास मदत केली.