मुस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नागराज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:23 AM2021-02-24T04:23:44+5:302021-02-24T04:23:44+5:30
सोलापूर : अटीतटीची निवडणूक झालेल्या मुस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नागराज कल्याणराव पाटील, तर उपसरपंचपदी रमेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात ...
सोलापूर
: अटीतटीची निवडणूक झालेल्या मुस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नागराज
कल्याणराव पाटील, तर उपसरपंचपदी रमेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात
आली. अध्यासी अधिकारी म्हणून रेवणा पाटील यांनी काम पाहिले.
मुस्ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाटील - जमादार
पॅनलने १५ पैकी १४ जागांवर विजय मिळवला होता. सत्ताधारी कळके - पाटील
गटाच्या माजी सरपंच मंगलताई कळके या एकमेव उमेदवार विजयी झाल्या
होत्या. पाटील - जमादार गटाचे नागराज पाटील यांची आज एक मताने निवड करण्यात
आली.
उपसरपंचपदासाठी रमेश धनजू चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे.
निवडीसाठी माजी सभापती भीमाशंकर जमादार, राजेंद्र गायकवाड, शैलेश पाटील, लक्ष्मण हरे, नागनाथ सुतार, बालाजी जमादार, ज्योतिबा चव्हाण, शेखआप्पा
शिंदे, रविकिरण मेहता, प्रकाश सुतार, आमिर नदाफ, गणपती वाघमारे, आमीन
मणियार यांनी परिश्रम घेतले.
नागराज
पाटील यांचे वडील कल्याणराव पाटील २६ वर्षांपूर्वी मुस्ती ग्रामपंचायतीचे
सरपंच होते. तत्पूर्वी गावची सत्तासूत्रे याच पाटील कुटुंबीयांकडे होती.
तब्बल १० वर्षांनंतर जमादार - पाटील गट सत्तेत आला आहे. निवडीनंतर पाटील
जमादार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला .
------
फोटो : २३ मुस्ती
मुस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीनंतर नूतन
पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती भीमाशंकर जमादार व राजेंद्र
गायकवाड उपस्थित होते.