नई जिंदगी, दाराशा हॉस्पीटलच्या हद्दीत आढळले कोरोनाचे नवे रूग्ण; सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्या पोहोचली १७ वर

By Appasaheb.patil | Published: March 15, 2023 05:37 PM2023-03-15T17:37:45+5:302023-03-15T17:37:57+5:30

शहरातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

Nai Zindagi, new corona patients found in Darasha Hospital premises; The number of corona patients in Solapur has reached 17 | नई जिंदगी, दाराशा हॉस्पीटलच्या हद्दीत आढळले कोरोनाचे नवे रूग्ण; सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्या पोहोचली १७ वर

नई जिंदगी, दाराशा हॉस्पीटलच्या हद्दीत आढळले कोरोनाचे नवे रूग्ण; सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्या पोहोचली १७ वर

googlenewsNext

सोलापूर : शहरातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी ६१ रूग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. त्यात तिघे जण पॉझिटिव्ह आढळून आले तर ५८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नई जिंदगी नागरी आरोग्य केंद्राच्या हद्दीतील दोन तर दाराशा हॉस्पीटलच्या हद्दीतील एक रूग्ण आहेत.

दरम्यान, सध्या १७ रूग्णांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत सोलापूर शहरात कोरोना बाधित असलेले रूग्ण ३४ हजार ५७२ तर आजपर्यंतची मृतांची संख्या १५१७ वर पोहोचली आहे. शहरात कोरोना बाधित असलेल्यांची संख्या १७ आहे तर रूग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ३३ हजार ३८ एवढी आहे.

सध्या शहरात कोरोना रूग्ण वाढत असल्याने महापालिकेच्या आराेग्य विभागाने आवश्यक त्या सेवासुविधा सज्ज ठेवल्या आहेत. शिवाय शासकीय रूग्णालयानेही वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून ठेवली आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सर्दी, ताप, खोकला व इतर आजारांची लक्षणे दिसून आल्यास संबंधित नजीकच्या डॉक्टरांना भेटून औषधोपचार करून घ्यावेत असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.

Web Title: Nai Zindagi, new corona patients found in Darasha Hospital premises; The number of corona patients in Solapur has reached 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.