नामदेवराव अन् दिलीपकुमारांचे लँडलाईनवर बोलणं व्हायचं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:15 AM2021-07-08T04:15:55+5:302021-07-08T04:15:55+5:30
अभिनेते दिलीपकुमार यांच्यासमवेत सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष व माजी आमदार नामदेवराव जगताप त्यांच्या पत्नी साधनाबाई जगताप व त्यांच्या ...
अभिनेते दिलीपकुमार यांच्यासमवेत सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष व माजी आमदार नामदेवराव जगताप त्यांच्या पत्नी साधनाबाई जगताप व त्यांच्या कन्या शोभाताई, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे एकत्रित कार्यक्रमानिमित्ताने असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दिलीपकुमार आणि नामदेवराव यांचे स्नेहाचे संबंध होते. १९६० मध्ये दिलीपकुमार सोलापुरात कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना जिल्हाधिकारी कार्यालयात नामदेवराव जगताप व दिलीपकुमार एकत्रित आले होते. त्यानंतर मुंबई येथे सांस्कृतिक कार्यक्रमात जगताप त्यांच्या पत्नी साधनाबाई व कन्या शोभाताई अभिनेते दिलीपकुमारांसमवेत पहिल्या रांगेतील खुर्चीत बसले होते. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
दिलीपकुमार व स्व. नामदेवराव जगताप यांची अनेकदा भेट झाली होती असे सांगितले जात आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. अजरामर भूमिका साकारणारे, दिलीपकुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील, अशा शब्दात त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
---
इन्नूसभाईंच्या वडिलांकडे दिलीपकुमार यायचे
ख्यातनाम सिने अभिनेते दिलीपकुमार व नामदेवराव जगताप यांचे स्नेहाचे संबंध होते. मी लहान होतो साहेबांचे व दिलीपकुमार यांचे नेहमी लँडलाईन फोन वरुन संभाषण व्हायचे. साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष असताना माजी आ. इन्नुसभाई शेख यांचे वडील जैनुद्दीन शेख यांचे सोलापुरात थिएटर होते. साहेब त्यांच्याकडे जायचे. तेथे दिलीपकुमार, राजकुमार यांना जैनुद्दीन शेख व साहेब भेटले होते. दिलीपकुमार व्यावसायिक नव्हे तर हाडाचे कलाकार होते या त्यांच्याबद्दच्या आठवणींना जयवंतराव जगताप यांनी उजाळा दिला.
----
फोटो : ०७ करमाळा
करमाळ्याचे नामदेवराव जगताप व ख्यातनाम चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांचे फोटो.